जेसीबी चालविण्यासाठी 50 हजार देण्याचा वाद विकोपाला गेला

56

कोथळी येथे दोघांना बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

मोताळा- पैसे कमविण्यासाठी कोण,कोणत्या प्रकारचा दिमाख लाविल हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या कोथळी गावात घडला. आरोपींनी जेसीबी चालविण्यासाठी 50 हजार रुपये द्यावे, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची धमकी देत दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना 20 मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणावंर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कोथळी येथील आरिफ खान अहमद खान यांनी बोराखेडी पोस्टे.ला फिर्याद दिली की, शेख ईरफान शेख हाशम, अब्दुल जमील अब्दुल रशीद यांच्याकडे जेसीबी असून ते पार्टनर आहेत. 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सय्यद युसुफ सय्यद मुसा, कुर्बान शाह मिस्कीन शाह यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना जेसीबी चालवायची असेल तर तुम्हाला आम्हाला पन्नास हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. तुम्ही हप्ता दिला नाहीतर तुमची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची धमकी देत बुधवार 20 मार्च रोजी सय्यद युसुफ सय्यद मुसा, कुर्बान शाह मिस्कीन शाह, मिस्कीनशाह हैदरशाह, तस्लीम शाह निस्कीन शाह, आरीफशाई मिस्कीनशाह, सय्यद समीर सय्यद युसुफ सर्व रा.कोथळी ता. मोताळा यांनी गैरकायद्याची मंडळी जमा करुन सप्यद युसुफ सय्यद मुसा याने त्याचे हातातील लोखंडी आसारीने अब्दुल जमील अब्दुल रशिद यांच्या पायावर मारहाण केली आहे. कुर्बानशाह याने त्याचे हातातील फायटरने अब्दुल जमील अब्दुल रशिद यांचे नाकावर मारहाण केली, फिर्यादी व त्यांचे पार्टनर शेख ईरफान हे त्यांचे भांडण सोडविण्यास गेले असता आरोपी मिस्कीन शाह हैदर शाह, तस्लीम शाह मिस्कीन शाह, आरीफशा मिस्कीनशाह, सय्यद समीर सय्यद युसुफ यांनी संगणमत करून, फिर्यादी व साक्षीदार यांना लोटपाट करन, शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरीफ खान यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त सहा आरोपींवर भादंवी.चे कलम 385, 324, 504, 506, 141, 143, 144, 147, 148, 149, सहकलम व 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

तहसिलचे पथक पाठविल्याच्या संशयावरुन कोथळी येथे हाणामारी
12 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल

मोताळा- तहसिल कार्यालयाचे पथक पाठविल्याच्या कारणाचा राग मनात धरुन 20 मार्च रोजी साक्षीदार व फिर्यादी कुर्बान शाह मिस्कीन शाह यांना कोथळी बसस्टॅण्डवर बोलावून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांना 12 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील कोथळी येथील कुर्बान शाह मिस्कीन शाह यांनी बोराखेडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेख ईरफान शेख हशम, आरीफ खान अहमद खॉन, शेख जमील शेख रशिद यांचेकडे जेसीबी असून ते रात्री अवैधरित्या सरकारी जमिनीतून जेसीबीने मुरुमाचा उपसा करुन त्याची विक्री करतात. 19 मार्च रोजी 11 वाजता तहसिल कार्यालयाचे पथक आल्याने आरोपी जेसीबी व ट्रॅक्टर घेवून तेथून पळून गेले होते. सदर तहसिल कार्यालयाचे पथक हे फिर्यादी व साक्षीदार पाठविल्याचा राग मनात धरुन साक्षीदार सय्यद युसुफ सय्यद मुसा यांना फोन करुन कोथळी बसस्टॅण्डवर बोलावून गैरकायद्याची मंडळी जमवून आरिफ खॉन अहमद खॉन याने फिर्यादीचे मोटार सायकलचे नुकसान करुन सर्व आरोपीतांनी संगणमत करुन साक्षीदार सैय्यद युसुफ सय्यद मुसा यांना चापटा बुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर आरीफ खॉन अहमद खॉन याने सय्यद युसुफ सय्यद मुसा याचे बरगडीत लोखंडी पाईपाने मारहाण करीत त्याला खाली पाडून त्याचे गळ्यावर व छातीवर पाय देवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कुर्बान शाह मिस्कीन शाह यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी आरिफ खॉन अहमद खॉन, शेख जमील शेख रशिद, शेख ईरफान शेख हाशम, शेख करीम शेख रशिद, शेख रशिद शेख गनी, शेख नईम शेख रशिद, नाशिर खॉन नसिम खॉन , अमीन खॉन अहमद खॉन, अहमद खॉन असउल्ला खाँन , शेख कलीम शेख हाशम , शेख सलीमा शेख हाशम, शेख वशिम शेख इक्बाल सर्व रा.कोथळी यांच्यावर बोराखेडी पोलिसांनी भादंवीचे कलम 324, 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149, 427, भा. दं. वी. सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.