राजूर घाटातील घटना; चौघांवर गुन्हा दाखल
मोताळा:बुलढाण्यातील राजूर घाटातील, देविचे मंदिराजवळ मोताळा येथील एका इसमास चौघांनी गाडीतून ओढून विष पाजण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 21 मार्च रोजी 7.30 वाजता घडली. याप्रकरणी चौघांवर बोराखेडी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
बोराखेडी येथील सुभाष किसन कुटे याने बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की, राजूर घाटातील, देविचे मंदिराजवळ राजूर शिवारात फिर्यादीची गाडी अडवून जयमंदा डॅनियल जाधव, जयंत डॅनियल जाधव, जगदिश डॅनियल जाधव, जयनंदा डॅनियल जाधव सर्व रा. तेलगु नगर, बुलढाणा यांनी संगणमत करुन फिर्यादीस गाडीतून ओढीत जयमंदा जाधव हीने मी तुझाशी लग्न केले, मला खावटी का देत नाही, असे म्हणत जयंत जाधव, जगदीश जाधव यांनी पकडून ठेवून जयमंदा हीने फिर्यादी सुभाष कुटे यांच्या तोंडाला विषारी औषधीची बाटली लावून विष पाजून जीवाने मारण्याचा प्रयत्न केला तर जयंत जाधव याने त्याचे हातातील चाकूने फिर्यादीचे डावे हाताचे मनगटाला मारुन जखमी करीत लाथा-बुक्यांनी मारहाण करीत शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, अशा सुभाष कुटे यांच्या फिर्यादीवरुन उपरोक्त चौघांवर बोराखेडी पोलिसांनी भादंवीचे कलम 307, 324, 341, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय राजवंत आठवले हे करीत आहे.
000




























