मोताळा:तालुक्यात चोरींच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत जयपूर येथील वेल्डींगच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून 72 हजाराचे साहित्य लंपास केल्याची घटना रविवार 11 ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोराखेडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा तालुक्यातील जयपूर येथील महादेव निनाजी सोनुने यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की, त्यांचे जयपूर बसस्टॅण्ड परिसरात जय गजानन वेल्डींगचे दुकान आहे. चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील कॉम्प्रेसर मशीन 15 हजार, ड्रील मशीन 17 हजार, इलेक्ट्रीक काटा 5 हजार, वेल्डींगचे मोठे मशीन 10 हजार, वेल्डींगची लहान मशीन 5 हजार रुपये, तसेच वेल्डींग करण्यासाठी आणलेले ग्रील, जिना, गेट इत्यादी सामान 20 हजार रुपये असा एकूण 72 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याच्या केला आहे. बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम 334 (1), 305(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.