‘जगप्रसिध्द’ फोटोग्राफर प्रशांन सोनोने यांची उलगुलान वेध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड !

13

बुलढाणा : आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेच्या बुलढाणा शाखेतर्फे रविवार २९ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे आयोजित सहाव्या उलगुलानवेध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जगप्रसिध्द छायाचित्रकार तथा जल जमीन जंगल चळवळीचे कार्यकर्ते, आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक तथा विचारवंत प्रशांत सोनोने यांची निवड करण्यात आली आहे.

चंद्रपूर येथील आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेच्यावतीने दरवर्षी आदिवासींच्या वर्तमान परिस्थितीवर विचारमंथन व्हावे, यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजीत करण्यात येते. यावर्षी २९ सप्टेंबर रोजी जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा प्रांगणात सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. गोविंद गायकी यांच्या अध्यक्षतेत आयोजित या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रशांत सोनोने यांची निवड करण्यात आली आहे. प्रशांत सोनोने हे जगप्रसिद्ध छायाचित्रकार असून समतावादी चळवळींसाठी कार्य करणारे समर्पित कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. आदिवासींसंदर्भात लढा उभारणारे व जल जमीन जंगल चळवळीचे खंदे कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांना ओळखण्यात येते. यावर्षीच्या साहित्य संमेलन स्थळाला क्रांतीवीर ‌दौलत भिल्ल साहित्य नगरी भिल्लठाणा, असे नाव देण्यात आले असून भगवान बिरसामुंडा व तंट्यामामा भिल्ल या दोन महान स्वातंत्र्यवीरांच्या लढ्याला समर्पित या साहित्य संमेलनात नागरीकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे व सदर साहित्य संमेलन ऐतिहासिक करावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रशांत सोनोने यांनी केले आहे.

सोनोने आदिवासी संस्कृतीचे गाढे अभ्यासक

सतत चिंतन मनन व वाचन करणारे, चळवळीसाठी कायम फिरस्तीवर असणारे प्रशांत सोनोने यांचा आदिवासी संस्कृतीचा दांडगा अभ्यास असून आदिवासींच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लढवय्ये कार्यकर्ते तथा सत्यशोधक विचारवंत म्हणून देशभरात त्यांचा लौकिक आहे. सोनोने हे आदिवासी संस्कृतीचे दांडगे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे.