मोताळा-दुर्गा उत्सवात विधवांना सहभागी करून घेण्याच आवाहन मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा .डी.एस. लहाने यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत येथील जय दुर्गा उत्सव मंडळाने विधवा महिलेच्या हस्ते देवीची मूर्ती बसवून, नऊ दिवस नऊ विधवांच्या हस्ते देवीची पूजा, आरत्या , होम हवन व विधी करण्याचा संकल्प केला आहे. तसेच होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये विधवांना समानतेची वागणूक देण्याची शपथ व विधवांच्या जीवनावर आधारित किर्तनही आयोजित केले आहे. या ठिकाणी विविध म्हणी व फलक लावून विधवा महिलांना सन्मान दिला जाणार आहे. या मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतूक होत आहे. दुर्गा उत्सव हा स्री शक्तीचा जागर आहे. मातृशक्तीची पूजा या दिवसांमध्ये केली जाते.मात्र घरातील जिवंत मातृशक्तीकडे दुर्लक्ष करून साजरा होणारा हा उत्सव विचार करायला लावणारा असल्याने प्रा. लहाने यांनी दुर्गा उत्सवात विधवांना सहभागी करून घेण्यासाठी चळवळ राबविली असून तिला जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
डी.एस.लहाने यांची अनोखी चळवळ
शुभ कार्यामध्ये विधवांना दूर ठेवल्या जाते. विधवांच्या हातून पूजाअर्चा करून घेतली जात नाही. त्यांना डावलल्या जाते.इतकच काय पतीच्या निधनानंतर ज्या मुलाचे संगोपन, मुल लहानसे मोठे होईपर्यंत जी आई करते त्याच्या लग्नात देखील तिला विधी मध्ये सहभागी करून घेतले जात नाही. जीथे स्वतःच्या मुलाच्या धार्मिक विधीचे स्वातंत्र्य नाही अशा ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम हा तर तिच्यासाठी दिवा स्वप्नच.. मात्र बुलढाण्यात प्रा. डी एस लहाने यांनी सामाजिक सुधारण्याची अनोखी चळवळ सुरू केली आहे.
विधवांनीच केली देवीची स्थापना
नऊ दिवस विधवांच्या हस्ते आरती ,देवीचे पूजन इतकेच नाही तर देवीची स्थापना ही विधवानीच केली आहे. या संदर्भात किर्तनही आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष भूषण वानखेडे ,प्रमोद कळस्कर यांनी दिली. कार्यक्रमासाठी भुषण वानखडे,निखिल जैस्वाल ,योगेश डांगे ,निलेश किरोचे ,गजानन चित्रंग, कार्तिक पाटील,नितेश घोगले,सुरेश घडेकर,विशाल पारस्कर,विशाल झालटे ,इंद्रजित देशमुख,अक्षय सुरळकर , अक्षय इंगळे,अक्षय कळसकर यांनी पुढाकार घेतला आहे.