पोलिसांनी बुलढाण्याच्या युवकाकडून देशी पिस्टल पकडले ! रोहिणखेड शिवारात स्थागुशा.व धा.बढे पोलिसांची संयुक्तीक कारवाई

17

मोताळा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा व धा.बढे पोलिसांनी संयुक्तीक कारवाई करीत बुलढाण्यातील इकबाल नगर येथील 23 वर्षीय युवकाकडून रोहिणखेड शिवारात 1 नाव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास देशी बनावटीचे 42 हजाराचे पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त केले.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा व धामणगाव बढे पोलिसांनी अ‍ॅक्शन मोडवर येत प्राप्त गोपनीय माहितीवरुन 1 नोव्हेंबर रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास रोहिणखेड शिवारात पेट्रोलींग करतांना बुलढाणा येथील इकबाल नगरातील शेख अरबाज शेख महेमुद (वय 23) याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या कंबरलेला लटकविलेली एक लोखंडी बॉडी असलेली देशी बनावटीचे अग्निशस्त्र मिळून आले. ज्यावर दोन्ही बाजुने काळ्या रंगाची प्लास्टीक ग्रीप असलेले ज्याची बॅरलची लांबी अं. 16 सेमी, पिस्टल ग्रीपची लांबी 10 से.मी. ज्यामधील मॅग्झीनची लांबी 11 सेमी 40 हजाराची पिस्टल तसेच दोन जिवंत राऊंड 2 हजार असा 42 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. धा.बढे पोलिसांनी बुलढाणा स्थागुशा पोहेकाँ.दिपक लुकुरवाळे यांच्या फिर्यादीवरुन शेख अरबाज शेख महेमुद याच्यावर कलम 3, 25 आर्म अ‍ॅक्ट, सह कलम 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.