मोताळा : मराठा समाजातील मुला-मुलींचे लग्न जुळविणे सोपे व्हावे, यासाठी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मोताळा येथे रविवार ८ डिसेंबर रोजी मराठा समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा पाटील युवक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठा समाजात विवाह जुळून येणे ही एक मोठी समस्या झाली आहे. ही सामाजिक समस्या हेरून सकल मराठा समाज व मराठा पाटील युवक समिती, मोताळा यांच्यावतीने मराठा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान मलकापूर बुलढाणा रोडवरील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मोताळा येथे वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालकांनी मेळाव्याला येतांना मुला-मुलींचे परिचय पत्र व फोटोसोबत आणावे. पुर्नविवाहासाठी सुध्दा सहभागी होता येणार आहे. मेळाव्याला मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. चळवळ गतिमान करण्यासाठी समाज-बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजक यांच्यावतीने करण्यात आले आहे.