मोताळा: मराठा समाजातील मुला-मुलींचे लग्न जुळविणे सोपे व्हावे, यासाठी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मोताळा येथे रविवार ८ डिसेंबर रोजी मराठा समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 256 वर तर 77 वधूंच्या पालकांनी सहभाग नोंदवित परिचय देवून मुला-मुलींच्या अनुरुप अपेक्षा व्यक्त केल्या.
माँ जिजाऊ यांची प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला बाळू पाटील, शरदचंद्र पाटील, प्रा.संतोष आंबेकर, अॅड.सतिशचंद्र रोठे, निनाभाऊ घनोकार, मोहन घुईकर, अॅड.योगेश म्हैसागर, छोटू पाटील यांच्या हस्ते हारअर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मेळाव्यात जिल्हाभरातील 333 वधू-वर पालकांनी उपस्थित राहून विवाहयोग्य मुला-मुलींचे परिचय पत्राची नोंदणी केली. यामध्ये 77 मुलींच्या तर 256 मुलांच्या पालकांचा समावेश होता. आवडी-निवडी, अपेक्षा याबद्दल माहिती व्हावी यासाठी वर-वधूंच्या पालकांनी सादर केलेल्या परिचयपत्राचे प्रमोद घनोकार, मंगेश सातव, अॅड. प्रशांत सोनुने, विकास पाटील यांनी वाचन केले. तर काही वधू-वर पालकांनी व मुलांनी स्वत: स्टेजवर येवून आपला परिचय दिला. समायोचीत मनोगतामध्ये मान्यवर समाजबांधवांनी मराठा समाज वधू-वर पालक मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होवून ही चवळवळ गावागावात पोहचविण्याचे आवाहन केले. वधू-वर परिचयपत्र नोंदणी प्रकीया विनोद कोल्हे, प्रसाद हुंबड, राजेश अढाव, अक्षय जुनारे, मंगेश भगत यांनी पार पाडली. प्रास्ताविक तुळशीराम मापारी यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत शिराळ यांनी केले. कार्यक्रमासाठी रविंद्र पाटील व प्रभाकर अढाव यांनी मंगल कार्यालय, प्रविण पाटील व नारायण कुकडे यांनी नास्त्याची तर प्रा.संतोष आंबेकर यांनी 11 हजाराची मदत देवून सामाजिक बांधिलकी जोपासली. शेवटी श्रीकृष्ण बांगर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला आमदारपूत्र पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर समाजबांधवांनी भेट देवून आयोजकांचे कौतूक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा पाटील युवक समिती तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण बांगर, उपाध्यक्ष प्रमोद घनोकार, उपाध्यक्ष प्रसाद हुंबड, निवृत्ती दिवाणे, विलास जुनारे, मारोती कोल्हे व समितीच्या सदस्यांनी अथ्थक परिश्रम घेतले.