तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर महादेव मंदीर वडगाव येथे संगीतमय रामायण कथेचे आयोजन

13

मोताळा : तालुक्यातील प्राचीन जागृत शिव मंदीर तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर संस्थान वडगाव (खं) येथे मागील ३८ वर्षापासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी रविवार १९ जानेवारी पासून संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्हाताचे आयोजन करण्यात आले आहे. कथावाचन १००८ प.पु. गुरुवर्य महंत स्वामी ब्रम्हस्वरुपानंद गिरी महाराज श्रीक्षेत्र काशी विश्वनाथ, मुक्तेश्वर संस्थान उगवा फाटा (जि.अकोला) हे करणार आहे. २६ जानेवारी रोजी हभप.वासुदेव शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

सप्ताहात सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ रामायण कथा, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ, रात्री ८.३० ते १०.३०किर्तनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. १९ जानेवारी रोजी हभप.कृष्णा महाराज (भालेगाव), २० जानेवारी हभप.ज्ञानेश्वर महाराज (शेलूद), २१ जानेवारी हभप.मंगेश महाराज (फुली), २२ जानेवारी हभप. योगीनीताई आळंदीकर, २३ जानेवारी हभप.संभाजी महाराज शिरके (वरखेड),२४ जानेवारी हभप.ज्ञानेश्वर महाराज गावंडे(निपाणा), २५ जानेवारी हभप.शिवदास महाराज राहणे (पान्हेरा), २६ जानेवारी रोजी रामायण ग्रंथाची शोभायात्रा श्रुंगेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालून सकाळी १० ते १२ दरम्यान हभप.वासुदेव शास्त्री महाराज (वाघजाळ)यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. संगितमय रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचा परिसरातील भाविक-भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक यांच्यावतीने करण्यात आले.