रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

14

तालुक्यातील कोथळी शिवारातील घटना; शेतकरी भयभीत !

मोताळा- शेतात गव्हाला पाणी देत असतांना अचानक रानडुकराने हल्ला चढविल्याने शेतकरी हमीद खा समशेर खा जखमी झालयाची घटना पलढग कोथळी शिवारात मंगळवार 7 जानेवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे उपचार सुरु आहेत.

तालुक्यातील कोथळी येथील शेतमजूर हमीद खॉ समशेर खॉ(वय 46) हे कोथळी गावाजवळ पलढग शिवारात गव्हाला पाणी देत होते. दरम्यान त्यांच्या 7 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या मकाच्या पिकात दडून बसलेल्या ५ ते ६ रानडुकारांनी अचानक हल्ला चढवित त्यांना जखमी केले. यावेळी त्यांनी मदतीसाठी जोर-जोरात आरडा-ओरड केल्याने आजुबाजुचे शेतकरी त्यांच्या मदतीसाठी धावून गेल्याने पुढील अनर्थ टळला. या हल्ल्यात हमीद खान यांच्या पंजा व डाव्या मांडीवरील रानडुकराने लचके तोडल्याने ते जखमी झाले. वनविभागाने जखमीची विचारपूस केल्याचे सांगण्यात आले. हमीद खान यांच्यावर जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचार सुरु आहेत. त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.