चोरट्यांचे करावे तरी काय? 19 तारखेला दरोडा आता चोरी !
मोताळा: दाभाडी येथील दरोड्याची घटना ताजी असतांना चोरट्यांनी आपला मोर्चा तालुक्यातील पिंपळपाटी गावाकडे वळवित कपाट फोडून अडीच लाखाचे सोन्याचे दागीणे व रोख रक्कम लंपास केल्याची चर्चा आहे. सदर घटना आज गुरुवार 23 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार पिंपळपाटी येथील संजय नारायण घाटे हे शेतात गेलेले होते. दरम्यान ते दुपारी 3.20 वाजेच्या सुमारास शेतातून घरी आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहिले असता त्यांच्या कपाटाचे लॉकर फोडून त्यातील अडीच लाखाचे सोन्याचे दागीणे व रोख 10 हजार रुपये लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. घरमालक व ग्रामस्थ बोराखेडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी पोहचल्याची माहिती समोर आली आहे.