बुलढाणा : जिल्ह्यामध्ये बलात्कार, विनयभंग, खून, चोऱ्यांच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. हुंडाबळी, विवाहिता व मुलीस आत्महत्येस परावृत्त करणे, जुन्या वादातून जीवघेणे हल्ला, दरोडा यासह आदी गंभीर गुन्ह्यामुळे त्यामध्ये मोठी भर पडली आहे. जिल्ह्यात २०२४ मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या वर्षात ४६०३ गुन्ह्याचा छडा लावला असून २४४९ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. यामध्ये २२६८ पुरुष, १७७ महिला व ४ तृतीयपंथी आरोपींचा समावेश आहे. ५९ पुरुष व १४ महिला अशा ७३ जणांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे.
वाढत्या गुन्हेगारीचा आलेख पाहता पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत २०२४ वर्षात अनेक गंभीर गुन्ह्यातील २४४९ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तर फरार आरोपींपैकी ७३ महिला व पुरुषांनी पोलिसासमोर आत्मसमर्पण केले आहे. प्राप्त माहितीनुसार अमडापूर पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ६० पुरुष तर ३ महिला आरोपींना अटक केली आहे. अंढेरा पोलिसांनी ७७ पुरुष व ४ महिला, बिबी पोलिसांनी ५० पुरुष व ६ महिला, बोराखेडी पोलिसांनी ३५ पुरुष व ३ महिला, बुलढाणा शहर पोलिसांनी १२८ पुरुष व ८ महिला, बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी ५२ पुरुष व ३ महिला, चिखली पोलिसांनी १४० पुरुष व ११ महिला, देऊळगाव राजा ५१ पुरुष व १२ महिला, धाड पोलिसांनी ५८ पुरुष व ८ महिला, धा.बढे पोलिसांनी ४४ पुरुष व १६ महिला, डोणगाव पोलिसांनी ४४ पुरुष व २ महिला, हिवरखेड पोलिसांनी ६७ पुरुष व ६ महिला, जलंब पोलिसांनी ४५ पुरुष व ८ महिला, जळगाव जामोद पोलिसांनी १६८ पुरुष व १४ महिला, जानेफळ पोलिसांनी ५५ पुरुष व ७ महिला, खामगाव शहर पोलिसांनी १३५ पुरुष व ५ महिला, खामगाव ग्रामीण पोलिसांनी ७१ पुरुष व ११ महिला, किनगाव राजा पोलिसांनी ४७ पुरुष व ७ महिला, लोणार पोलिसांनी ११ पुरुष व २ महिला, मलकापूर शहर पोलिसांनी ७७ पुरुष व २ महिला, मलकापूर ग्रामीण पोलिसांनी ३५ पुरुष व ५ महिला, मेहकर पोलिसांनी ११७ पुरुष व ५ महिला, एमआयडीसी मलकापूर पोलिसांनी ५ पुरुष, नांदुरा पोलिसांनी १३८ पुरुष व ६ महिला, पिंपळगाव राजा पोलिसांनी ५९ पुरुष व १ महिला, रायपूर पोलिसांनी ३५ पुरुष व १ महिला, साखरखेर्डा पोलिसांनी ३२ पुरुष व १ महिला, शेगाव शहर पोलिसांनी १३३ पुरुष व १ महिला, शेगाव ग्रामीण पोलिसांनी ३९ पुरुष व २ महिला, शिवाजीनगर पोलिसांनी ५६ पुरुष व १ महिला, सिंदखेडराजा पोलिसांनी ४३ पुरुष व ४ महिला, सोनाळा पोलिसांनी ९१ पुरुष व २ महिला, तामगाव पोलिसांनी ७० पुरुष व १० महिला यांना अटक केली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अॅक्शन मोडवर आहे.
- ७३ जणांनी केले आत्मसमर्पण
विविध गुन्ह्यातील फरार ७३ जणांनी आत्मसमर्पण केले.यामध्ये अमडापूर पोलिस हद्दीतील १० पुरुष व ३ महिलांनी आत्मसमर्पण केले आहे. बुलढाणा शहर हद्दीतील ७ पुरुष व १ महिला, मलकापूर शहर ६ पुरुष १ महिला, मलकापूर ग्रामीण १ पुरुष, पिंपळगाव राजा ३ पुरुष १ महिला, रायपूर पुरुष २ व ३ महिला, शेगाव शहर ८ पुरुष १ महिला, शेगाव ग्रामीण १५ पुरुष ३ महिला, सोनाळा ७ पुरुष व १ महिला अशा ७३ आरोपींनी आत्मसमर्पण केले आहे. - गुन्हेगारीत महिलाही मागे नाहीत
पोलिसांनी विविध गुन्ह्यामध्ये पकडलेल्या आरोपींमध्ये १८ ते ४० वर्ष वयोगटातील सर्वाधिक १८०७ आरोपी आहे. महिलाही मागे नसून त्यांचा आकडा सुध्दा १०६ आहे. ४१ ते ६० वयोगटातील ४६१ पुरुष तर ७१ महिलांचा समावेश आहे. बालगुन्हेगारी सुध्दा वाढल्याची आकडेवारी समोर आली असून पुरुषांच्या तुलनेत महिला गुन्हगारांचे प्रमाण कमी असलेतरी नगण्य मात्र नाही. - ज.जामोद पोलिसांची सर्वाधिक कारवाई
जळगाव जामोद पोलिसांची कारवाई टॉपवर असून पोलिसांनी १६८ पुरुष व १४ महिला आरोपींना अटक केली. त्या पाठोपाठ चिखली असून पोलिसांनी १४० पुरुष व ११ महिला, खामगाव शहर पोलिसांनी १३५ पुरुष व ५ महिला, शेगाव शहर पोलिसांनी १३३ पुरुष व १ महिला, बुलढाणा शहर पोलिसांनी १२८ पुरुष व ८ महिलांना अटक करीत ७६ टक्के गुन्ह्यांचा छडा लावला आहे.