मुलाचा राग अनावर झाला; त्याने वडिलाचा मुर्दाच पाडला !

2

मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील घटना

मोताळा- आई-वडिलांच्या दररोजच्या वादातून 20 वर्षीय मुलाने जन्मदात्या बापाला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत वडिलाचा मृत्यू झाला. धा.बढे पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर घटना मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे घडली. आरोपी मुलाचे नाव भैय्या ऊर्फ यश बावणे तर मृतक वडिलाचे नाव नंदकिशोर बावणे, असे आहे.

मोताळा तालुक्यातील धा.बढे पोलिस स्टेशन पासून 7 कि.मी.अंतरावर सिंदखेड गाव आहे. तेथे नंदकिशोर कौतिक बावणे (वय 42) कुटुंबीयासोबत राहतात. नंदकिशोर बावणे व त्यांची पत्नी कविता यांच्यामध्ये नेहमी वाद होते होते. या वादातून कविता बावणे यांनी 14 एप्रिल रोजी मंदीर मारण्याची औषधी खाल्ल्याने त्यांना लध्दड हॉस्पीटल बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. वडिल आईशी भांडत असल्यामुळे भैय्या ऊर्फ यश नंदकिशोर बावणे (वय 20) याला वडिलाचा नेहमी राग येत होता. त्या रागातून त्याने नंदकिशोर बावणे यांना गुरुवार 17 एप्रिल रात्री 11 वाजेच्या दरम्यान, वडिलाच्या डोक्यात व छातीवर फावड्याच्या लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याने त्यांना उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान नंदकिशोर बावणे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विद्यानंद बावणे यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी वडिलाच्या खून प्रकरणी यश बावणे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास धा.बढे सहाय्यक पोलिस निरिक्षक नागेश जायले हे करीत आहे.