अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल; जिल्ह्याचा 95.52 टक्के निकाल; तेराही तालुक्यात मुलीचं लई भारी; यावर्षी 0.16 टक्के निकाल वाढला !!

18

बुलढाणा- दहावीच्या परिक्षेचा निकाल मंगळवार १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. गतवर्षीही मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही मुलीच विभागात अव्वल राहिल्या. अमरावती विभागाचा निकाल ९२.९५ टक्के लागला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के एवढा लागला असून जिल्हा विभागात प्रथमस्थानावर आहे. १९० विद्यालयांनी शंभरी गाठली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याचा निकाल ०.१६ टक्क्यांनी वाढला आहे.

दहावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यातून ३९ हजार ५०९ एवढ्या विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी ३८ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परिक्षा दिली, यापैकी ३७ हजार २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २० हजार २७६ विद्यार्थी तर १६ हजार ९७६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची टक्केवारी ९४.५३ टक्के तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.७४ टक्के एवढी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तेराही तालुक्यात मुलीचं अव्वलस्थानी आहेत. जिल्ह्याचा निकाल ९५.५२ एवढा निकाल लागला आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्याचा निकाल ९७.४१ टक्के, मोताळा तालुका ९५.८९, चिखली तालुका ९७.१८ , दे.राजा ९६.४२, सिं.राजा ९७.९४, लोणार ९५.०५, मेहकर ९६.८९, खामगाव ९४.०१, शेगाव ९३.९३, नांदूरा ९३.७४, मलकापूर ९३.८६, ज.जामोद ९२.९२, संग्रामपूर तालुक्याचा ९२.४२ टक्के निकाल लागला आहे, त्याची टक्केवारी ९५.५२ एवढी आहे. ३८ हजार ९९६ परिक्षार्थीपैकी २०,२७६ मुले तर १६,९७६ मुली असे एकूण ३७,२५२ विद्यार्थी पास झाले आहेत.

  • १०० टक्के निकालाची तालुकानिहाय आकडेवारी
    जिल्ह्यातील १९० विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील ३० शाळांचा समावेश आहे. मोताळा तालुक्यातील ८ शाळा, चिखली तालुक्यातील ३३, देऊळगाव राजा तालुका १०, सिंदखेड राजा तालुका २०, लोणार तालुका १२, मेहकर तालुका १५, खामगाव तालुका २७, शेगाव तालुका ८, नांदूरा तालुका १०, मलकापूर तालुका ४, जळगाव जामोद तालुका ७ तर संग्रामपूर तालुक्यातील ६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे
  • ३७,२५२ विद्यार्थी झाले उत्तीर्ण
    दहावीची परिक्षा ३८ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ३७ हजार २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये २१ हजार ४४९ विद्यार्थ्यांपैकी २० हजार २७६ विद्यार्थी पास झाले असून त्याची टक्केवारी ९४.५३ टक्के एवढी आहे. तर १७ हजार ५४७ विद्यार्थीनीपैकी १६ हजार ९७६ विद्यार्थीनी पास झाल्या असून त्याची टक्केवारी ९६.७४ टक्के एवढी आहे.
  • १६,६४० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत
    जिल्ह्यातील ३८ हजार ९९६ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ६४० विद्यार्थी प्रावीण्यश्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. प्रथमश्रेणीत १२ हजार ७ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत ७ हजार १८१ व १४२४ विद्यार्थी पास झाले आहेत.
  • अकोला जिल्ह्याचा सर्वात कमी निकाल
    अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्याने बाजी मारली असून जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के एवढा आहे. द्वितीयस्थानी वाशिम जिल्हा असून त्याचा निकाल ९५.४१ टक्के एवढा आहे. अमरावती जिल्हा तृतीयस्थानी असून त्याचा निकाल ९२.८६ टक्के, यवतमाळ जिल्हा ९१.५१ टक्के आहे. अकोला जिल्ह्याचा ८९.३५ टक्के निकाल लागला असून तो विभागात सर्वात कमी आहे.