मोताळा- निलेश राणे युवा प्रतिष्ठान एनजीओ दर्पण व निती आयोग कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये मोताळा तालुकाध्यक्षपदी विष्णु शिराळ तर उपाध्यक्षपदी अॅड.प्रशांत सोनोने यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
निलेश राणे युवा प्रतिष्ठान मुंबई एनजीओ दर्पण व निती आयोग (भारत सरकार) संस्थेची बुलढाणा व मोताळा तालुका कार्यकारिणी अध्यक्ष निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील यांनी नुकतीच जाहिर केली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी संजय मनोहर शिराळ, तालुकाध्यक्षपदी विष्णु नरहरी शिराळ, तालुका उपाध्यक्षपदी अॅड.प्रशांत शिवाजीराव सोनोने, मोताळा शहरअध्यक्षपदी श्रीकृष्ण मुकुंदा बांगर तर मोताळा तालुका सचिवपदी गणेश विष्णु वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेवून करण्यात आली. संस्थेचे कार्य पुढे नेण्यात मदत होईल, अशी अपेक्षा नियुक्तीपत्राद्वारे संस्थेचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे यांनी व्यक्त केली आहे.