महिंद्रा गाडीची अ‍ॅपेला जबर धडक; 1 ठार

7
  • चालकावर गुन्हा दाखल; मोताळा तालुक्यातील घुस्सर फाट्याजवळील घटना

मोताळा- महिंद्रा गाडीच्या चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवित अ‍ॅपेला मागून जबर धडक दिली. या धडकेत अ‍ॅपेचालक ठार झाल्याची दुदैवी घटना 14 सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. मृतक हा मलकापूर येथील असून त्याचे नाव बिसमिल्ला शाह अयुब शाह असे आहे.

मलकापूर येथील मुस्ताक अली नगर येथील मकबुल शहा अयुब शाह यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली की, त्यांचा भाऊ बिस्मिल्ला शाह अयुब शाह त्याचे मालवाहक अ‍ॅपे क्र. MH.21 X.8368 घेवून रविवार 14 सप्टेंबर रोजीबुलढाणाकडून घरी मलकापूरकडे परत जात होता. दरम्यान रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मालवाहू अ‍ॅपेला बुलढाणा-मलकापूर रोडवरील घुस्सर फाट्याजवळ सुसाट वेगाने येणाऱ्या महिंद्रा TUV 300 गाडी क्र. MH.19 CU.8829 चा चालक प्रशांत किशोर आराख रा. फेकरी, ता.भुसावळ जि.जळगाव खांदेश याने अ‍ॅपेला मागून जबर धडक दिली. या धडकेत बिस्मिल्ला शाह अयुब शाह याचा मृत्यू झाला. अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी प्रशांत किशोर आराख, रा. फेकरी याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम 281, 106 (1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.