घुस्सर येथे हाणामारी झाली; 7 जणांवर गुन्हा पण दाखल ? मात्र, दोन्ही घटनेतील फिर्यादी विनोद जाधवच ? आणि आरोपी सुध्दा विनोद जाधवचं !!

5

मोताळा- खरचं ऐकावं ते नवलचं, असचं काहीतरी थोडसं मोताळा तालुक्यातील घुस्सर बु. येथे घडलं..उसनवारी पैसे तसेच मोटार सायकलमध्ये उधार पेट्रोल भरण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद हाणामारी झाली. सदर घटना मंगळवार 23 सप्टेंबर रोजी घडली. मात्र, दोन्ही घटनेतील फिर्यादीचे नाव एकच, ते म्हणजे विनोद जाधव, हे साम्य कसे हा योगायोग मात्र एका फिर्यादीचे नाव विनोद सरदार जाधव तर दुसऱ्या फिर्यादीचे नाव विनोद ज्ञानदेव जाधव, हा योगायोग जरी असला तरी एका प्रकरणात एक आरोपी तर दुसरा फिर्यादी, तर दुसरा आरोपी तर एक फिर्यादी असाच]एक किस्सा समोर आला आहे. काय आहे प्रकरण समजून घेऊ या??

मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या घुस्सर येथील विनोद सरदार जाधव (वय 47) यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, विनोद ज्ञान‌देव जाधव याने फिर्यादीकडे असेलले उसनवारीचे 20 हजार रुपये परत देण्याच्या कारणावरुन वाद करुन विनोद ज्ञा.जाधव, दिपक ज्ञानदेव जाधव, करण विनोद जाधव, अंतरिक्ष विनोद जाधव यांनी चापटाबुक्यांनी मारहाण केली. विनोद ज्ञा.जाधव याने फिर्यादीला लोखंडी फायटरने फिर्यादीचे नाकावर मारून जखमी केले. तर अभिषेक जाधव याला करण विनोद जाधव याने चाकुने उजव्या डोळ्याच्या खाली मारुन जखमी केले. सरला निनाजी जाधव व निनाजी सरदार जाधव हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनी दिपक ज्ञा.जाधव व अंतरिक्ष जाधव जाधव यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिविगाळ करत फिर्यादीचे कुटुंबाला तसेच पुतण्याला शिविगाळ व मारहाण करुन जीवाने मारण्याची धमकी दिल्याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी विनोद ज्ञानदेव जाधव , दिपक ज्ञानदेव जाधव, करण विनोद जाधव तसेच अंतरिक्ष विनोद जाधव सर्व रा.घुस्सर यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(1), 115,352,351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला. तर विनोद ज्ञानदेव जाधव (वय 43) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, फिर्यादीचा मुलगा अजित जाधव याने विनोद सरदार जाधव यास त्याचे मोटर सायकल मध्ये उधार पेट्रोल टाकण्यास नकार दिल्यावरुन विनोद सरदार जाधव याने फिर्यादीचा मुलगा अजित याला तू गावात ये पाहून घेतो अशी धमकी देत तो गावात आल्यावर त्याला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. सदर प्रकार अजितने घरी सांगितल्यावर फिर्यादी हे त्यांची बहीण ज्योंती रमेश सोनुने व आई वत्सला यांच्यासह विनोद स.जाधव याला समजावुन सांगण्यासाठी त्याचे घरी गेले असता विनोद सरदार जाधव, निनाजी जाधव, संतोष जाधव हे घरी हजर होते. यावेळी फिर्यादीचे काही ऐकून न घेता शिविगाळ व लोटपोट करुन चापटा बुक्यांनी मारहाण केली. तसेच निनाजी जाधव याने त्याचे हातात कुऱ्हाड घेवून आला असता बहिण ज्योती त्याला अडविण्यासासाठी मध्ये आली असता निनाजी जाधव याने फिर्यादीच्या बहिणीच्या उजव्या हातावर कुऱ्हाड मारली. तसेच आई वत्सलाला देखील उपरोक्त तिघांनी मारहाण करुन लोटपाट केल्याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी विनोद स. जाधव, निनाजी जाधव, सिताराम जाधव सर्व रा. घुस्सर बु. यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(1),115,352,351(2),3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनेचा तपास मात्र, पोहेकाँ.विजय सुरडकर हे बोराखेडी पोलिस निरिक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखली करीत आहे.