अस्तीत्व संघटनेच्या प्रेमलता सोनोने शेतकऱ्यांच्या बांधावर! शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी !!

28

मोताळा- तालुक्यातील चार मंडळात 1 नाव्हेंबरच्या रात्री दोनवाजेपासून 2 नोव्हेंबरच्या सकाळी 5 पर्यंत ढगफुटी सदृश्य पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील कपाशी, तूर, सोयाबीन, मका पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे. अस्तीत्व संघटनेच्या अध्यक्षा सौ.प्रेमलताताई सोनोने यांनी 2 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवून नुकसाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी केली.

प्रेमलताताई यांनी तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी करीत मदतीपासून कोणालाही वंचित ठेवण्यात येवू नये, याची काळजी घेण्याचे सांगितले. ढगफुटी पावसामुळे धा.बढे, पिंपळगाव देवी, पिंप्री गवळी व शेलापूर मंडळातील पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सर्वे करुन सरसकट मदत देण्याची त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली. त्यांनी आव्हा, टाकळी, माळेगाव, कोल्ही गवळी, टाकळी येथील नुकसानीची शेतकऱ्यासमवेत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद पाटील, गजानन कुकडे, उमेश घोंगटे, कृष्णा गवई, कृष्णा घोंगटे, संतोष घोंगटे, अतुल नारखेडे तसेच मालेगांव, सावरगांव, दहीगांव, आव्हा आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.