बुलढाणा येथे वंचितची जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठक संपन्न
बुलडाणा- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत सन्मानपुर्वक युती न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची पदाधिकाऱ्यांनी तयारी ठेवावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी केले.
निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची जिल्हा संयुक्त बैठक रविवार 2 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे पार पडली. त्योवळी निलेश जाधव बोलत होते. बैठकीचे आयोजन जिल्हा निरीक्षक तथा वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय सदस्य सविताताई मुंढे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गर्शन करुन तालुका व शहर पदाधिकारी यांच्याकडून निवडणुकी संदर्भात आढावा घेतला.
पुढे बोलतांना निलेश जाधव यांनी समविचारी पक्षांसोबत युती करण्याचे अधिकार हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हाकार्यकारणीला दिलेला असून भाजपा व त्यांचे सहकारी पक्ष सोडून समविचारी पक्षाकडून आलेला प्रस्ताव हा राज्यकमीटीला मान्यतेसाठी पाठवण्यात येईल, असे सांगितले. मान न मिळाल्यास स्वबळाची तयारी ठेवण्याचे जाधव म्हणाले. यावेळी देवा हिवराळे जिल्हाध्यक्ष उत्तर,शरदभाऊ वसतकार,राजाभाऊ भोजने ,प्रविन पाटील, प्रशांत वाघोदे, सम्यक जिल्हाघ्यक्ष मोहीत दामोदर, महीला आघाडीच्या विशाखाताई सावंग यांनी आपले समायोचीत भाषण केले.
या बैठकीला विष्णू उबाळे,शेषराव मोरे.भीमराव शिरसाट विद्याधर गवई,आबाराव वाघ,प्रिती ताई शेगोकार, वसंतराव तायडे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी बी इंगोले, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे,विशाल गवई, तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, समाधान डोंगरे,अजय सावळे,संजय धुरंधर, रमेश नाईक,अनिल धुंदळे, मनोज खरात, दिलीप राठोड, adv.बबन वानखेडे, मिलिंद वानखेडे, बाळू भिसे, किशोर भीडे, देवा दामोदर, सलमानभाई,आजम कुरेशी,विशाल मोरे, विलास प्रधान, शेषराव उमाळे,संजुभाऊ खराटे, दिलीप वाकोडे, रविराज खराटे,सागर बोदडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ता बैठकीला उपस्थित होते.




























