
तळणी येथील लाभार्थ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
मोताळा- केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘ओबीसीं’साठी मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला. काहींना हप्त्याचे पैसे देण्यात आले. मात्र काहींना घरकुलाचे पैसे देण्यात आले नाही. सदर घरकुलांचे थकीत पैसे देण्याची मागणी तळणी येथील लाभार्थ्यांनी मोताळा गटविकास अधिकारी यांच्या लक्षात बाब आणून हप्त्याचे थकीत पैसे देण्याची मागणी केली.
२०२५-२६ नुसार पहिल्या काही वर्षी लाभार्थींना १५ हजाराचा हप्ता वितरीत झाला. काहींना पहिला किंवा दुसरा हप्ता मिळाला नाही. काहींचे तर घर बांधकाम पुर्ण करून झाले असता सुध्दा घरकुल हप्ता चे पैसे मिळाले नाही. शासनाकडे फंड नसल्याचे पंचायत समिती मधून सांगण्यात येते. सध्या रमाई, शबरी, प्रधानमंत्री आवास योजना, पारधी आवास योजना, बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून बेघरांना हक्काचा निवारा दिला जात आहे.
याशिवाय राज्यातील बेघर ओबीसी घटकासाठी राज्य सरकारने मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय गतवर्षी घेतला. त्यानुसार तीन वर्षांत राज्यात दहा लाख लाभार्थींना घरकुले मिळणार आहेत. तळणी येथील लाभार्थ्यांचे घरकुलाचे पैसे देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी निवेदन देतांना तळणीचे उपसरपंचपति प्रविण नारखेडे, ग्रा.पं सदस्य संदिप झोपे, सत्याचा शोध मुख्य संपादक गणेश वाघ, लहू राणे, गणेश उज्जैनकार, शिकांदर खानंदे, गोपाळ निंबोळकर, रविंद्र नारखेडे, राम जोशी, गजानन तायडे सह आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.

























