कोथळीत 16 हजाराचा गांजा पकडला

13

मोताळा- बोराखेडी पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहितीवरुन कोथळी येथील 25 वर्षीय युवकाच्या घरातून 16 हजार 200 रुपये किमतीचा 810 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सदर कारवाई 7 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास करण्यात आली.

बोराखेडी पोलिस कोथळी परिसरात आज 7 नोव्हेंबर रोजी दुपारी पेट्रोलींग करीत होते. यावेळी त्यांनी गोपनीय बातमीदाराकडून कोथळी येथील युवक घरामध्ये गांजा बाळगून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकीत कोथळी येथील 25 वर्षीय अफरोज खॉन अनिस खॉन याच्या ताब्यातून ओलसर हिरवट रंगाचा ८१० ग्रॅम १६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. एपीआय. बालाजी शेंगेपल्लू यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी सदर युवकाविरुध्द बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील पोलिस करीत आहे.