धा.बढे पोलिस स्टेशन हद्दीतील घटना; तिघांच्या मुसक्या आवळल्या
मोताळा: तालुक्यातील श्रीक्षेत्र थड गाव तसे शांतच आहे. सर्व समाजाचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. मात्र, 12 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास गावात काही विपरीत घडलं…! किराणा दुकानाच्या वादातून चौघांनी एकाला दगडांनी व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये 53 वर्षीय प्रल्हाद रामलाल धनवटे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गावातील धनवटे विरुध्द धनवटे यांचा दुकानाच्या जागेच्या कारणावरुन जुना वाद आहे. सदर वादाचे 12 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता किराणा दुकानाची जागा ग्राम पंचायतमध्ये तुमच्या नावाने कशी काय केली? या कारणावरुन उफाळून आला.विकास सतोष धनवटे व सागर संतोष धनवटे हे प्रल्हाद रामलाल धनवटे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातात दगड घेवून त्यांच्या डोक्यात व कपाळावार दगडाने बेदम मारहाण करीत त्यांना जखमी केले. तर विकास धनवटे, सुनिता संतोष धनवटे यांनी प्रल्हाद धनवटे यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर लाथांनी मारहाण केली. तर संतोष धनवटे याने प्रल्हादला जिवंत सोडायचे नाही, याला मारुन टाका असे म्हणीत जीवे मारण्याची धमकी देत मुक्ताबाई धनवटे यांचे केस धरुन चापटांनी मारहाण केली. या मारहाणीत प्रल्हाद धनवटे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या मात्र, एक फरार झाला आहे. सौ. मुक्ताबाई प्रल्हाद धनवटे यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी उपरोक्त चौघाविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम 109,115 (2), 352,351 (2) (3), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर हे करीत आहे. घटनेचे गांभीर्य पाहता बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेतली. यामध्ये नविन व्टिस्ट आल्यास गंभीर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे??


























