मोताळा: पैसे किंवा मोबाईल, सोने सापडल्यास त्याचा प्रत्येकाला मोह असतो. मात्र काहीजण प्रामाणिकपणा जोपासीत सापडलेली वस्तु परत करता. अशीच एक घटना आज शुक्रवार 20 मार्च रोजी मोताळा बसस्थानक परिसरात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. सहकार विद्या मंदिरच्या कु.धनश्री विष्णु शिराळ या मुलीने सापडलेला मोबाईल वाहतूक नियंत्रक नितीन मोरे यांच्याकडे सुपूर्द करुन प्रामाणिकपणाचा प्रत्येय दिला.
टाकळी येथील धनश्री शिराळ ही मोताळा येथील सहकार विद्या मंदीर मोताळा येथे इयत्ता नववीत शिकते. आज 20 मार्च रोजी धनश्री आपल्या आईसोबत सायंकाळी 6 वाजता मोताळा बसस्थानक येथून नांदुरा येथे जात होती. दरम्यान, तिला बसस्थानक परिसरात एक मोबाईल सापडला. तीने मोबाईलचा कोणत्याही प्रकारचा मोह न बाळगता प्रामाणिकपणा दाखवित सदर मोबाईल वाहतूक नियंत्रक नितीन मोरे यांच्याकडे सुपूर्द करीत सदर मोबाईल ज्यांच्या असेल त्यांना परत करण्याचे सांगितले. धनश्रीने मोबाईल परत केल्याने तिचे वाहतूक नियंत्रक व उपस्थित प्रवाशांनी कौतूक केले. सदर मोबाईलमध्ये 9111877073 नंबर सीम असून सदर मोबाईल कोणाचा असल्यास त्यांनी मोताळा बसस्थानक येथे वाहतूक नियंत्रक नितीन मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.



























