Wednesday, May 13, 2026
Home Buldana तळणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात;  केळीच्या पात्रावर महाप्रसाद...

तळणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात;  केळीच्या पात्रावर महाप्रसाद देवून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश !

48

तळणी- मोताळा तालुक्यातील तळणी येथे ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असा धीर देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याने संपूर्ण परिसर स्वामींच्या दिव्य ऊर्जेने आणि प्रसन्नतेने न्हाऊन निघाला होता. तळणी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. यावेळी भक्तांना केळीच्या पात्रावर महाप्रसाद वितरीत करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

प्रकट दिनानिमित्त सेवा केंद्रामध्ये पहाटेपासूनच मंगलमय वातावरणात विधीवत पूजनाला सुरुवात झाली. सकाळी श्री स्वामी चरित्र सारांमृत ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले. यानंतर श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करण्यात आले. भक्तीमय वातावरणाने वातावरण प्रसन्नमय झाले होते. सायंकाळी स्वामींच्या जयघोषात आणि मंत्रोच्चारात भव्य महाआरती झाली. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्यात सुमारे दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. .

  • शिस्तबध्द पध्दतीने महाप्रसादाचे वाटप
    सेवा केंद्रातील स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने एक आदर्श पायंडा घालून दिला. सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर वाढत असताना, या सोहळ्यात प्लास्टिक द्रोण, वाट्या किंवा प्लेट्स यांसारख्या पर्यावरणास घातक वस्तूंना फाटा देण्यात देत आरोग्यदायी अशा केळीच्या पानावर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. केंद्राच्या या पर्यावरणपूरक भूमिकेचे कौतूक होत आहे. या उपक्रमातून केवळ धार्मिकताच नव्हे, तर ‘स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण’ हा स्वामींचा सेवाभावही अधोरेखित झाला.
Don`t copy text!