Wednesday, May 20, 2026
Home Buldana अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा; तोंडी आलेला घास हिरावला ; 11 तालुक्यातील २०१ गावे...

अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा; तोंडी आलेला घास हिरावला ; 11 तालुक्यातील २०१ गावे बाधित; ३ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रात प्रचंड नुकसान

52

गणेश वाघ

बुलढाणा : जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले आहे. १८ व १९ मार्च रोजी झालेल्या विजांच्या कडकटासह पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळीचा ११ तालुक्याला मोठा फटका बसला आहे. यामध्ये २०१ गावे बाधित झाले असून ३ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे. तर मेहकर व सिंदखेड राजा मात्र नैसर्गीक आपत्तीच्या तावडीत बचावल्याने तेथे कु’लेही नुकसान झाले नाही.

यामध्ये बुलढाणा, मलकापूर, चिखली, मोताळा, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, लोणार, देऊळगाव राजा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील १४ गावे बाधित झाले असून कांदा , चिया, गव्हाचे १४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. चिखली तालुक्यात १८ गावात मका, ज्वारी, गहू, हरबरा,कांदा, भाजीपाला,डाळींब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, आंबा पिकांचे ७१२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले आहे.मोताळा तालुक्यात १६ गावातील मका, गहू, ज्वारी, बाजरी पिकांचे १०२ हेक्टर क्षेत्रातील, मलकापूर तालुक्यात ४२ गावातील गहू, हरबरा,रब्बी ज्वारी, मका पिकांचे ७४० हेक्टर क्षेत्रातील, खामगाव तालुक्यातील २० गावातील कांदा, मका, ज्वारी, बाजरी पिकांचे १४८ हेक्टर क्षेत्रातील, शेगाव तालुक्यात २ गावे बाधित झाले असून कांदा व गव्हाचे ५ हेक्टर क्षेत्राचे, नांदुरा तालुक्यात१५ गावातील मका, गहु, कांदा पिंकाचे २१० हेक्टर क्षेत्र, जळगाव जामोद तालुक्यात ४१ गावातील गहु, कांदा, मका, ज्वारी पिकांचे ९५० हेक्टर क्षेत्राचे, संग्रामपूर तालुक्यात ११ गावातील गहू, मका, केळी व कांदा पिकांचे ७० हेक्टर क्षेत्राचे, लोणार तालुक्यात १० गावातील कांदा, चिया, गव्हाचे १९० हेक्टर क्षेत्राचे, देऊळगाव राजा तालुक्यात १२ गावातील गहू,कांदो व ज्वारी पिकांचे ५३० हेक्टर असे एकूण २०१ गावातील ३ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. नुकसानीचा सर्वे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Don`t copy text!