दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु आहे उपोषण
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (23 FEB.2023) जिल्ह्यात भुमिहीन, अनुसूचित जाती व मागासवर्गीय लोकांनी गायरान शेतीवर अतिक्रमण करुन आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. परंतु सरकारने त्या गायरान जमिनीवर सौरउर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे. त्या जमिनीवर सौरउर्जा प्रकल्प उभारु नये, या मागणीसाठी समता संघटनेच्यावतीने 22 फेब्रुवारीपासून अध्यक्ष नितीन गवई यांच्या नेतृत्वात बहुसंख्ये अतिक्रमण धारकांनी उपोषण सुरु आहे, त्या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याने ते आज 23 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशीही सुरु होते.
समता संघटनेच्यावतीने जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुमिहीन, अनुसूचित जाती व मागासवर्गीय लोकांनी गायरान जमिनवीवर कुटुंबीयांच्या उपजिविकेकरीता शेती प्रयोजनासाठी बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण केले आहे. परंतु त्या लोकाप्रती शासनाने कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखविता त्यांच्या ताब्यातील जमिनीवर सौर उर्जा प्रकल्प करण्याचा घाट घातला आहे. सौर उर्जा प्रकल्प हा भुमिहीन शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर न घेता शासकीय पडीत जमिनीवर किंवा खाजगी जमिनीवर घेण्यात यावा, या मागणीसाठी समता संघटनेने भूमिहीन व अनूसुचित जाती व मागासवर्गीय लोकांच्या न्याय्य मागण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष नितीन गवई यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु केले ते मागण्या मान्य होईपर्यंत मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या उपोषणामध्ये गौतम क्षीरसागर, दगडुबा क्षीरसागर, केजीवाल बच्छीरे, सरसाबाई कांबळे, सुविद्याबाई वानखेडे, राधाबाई मोरे, विजय शिंदे, विजय इंगळे, दामोदर वानखडे, कशीनाथ आंभोरे, किसन सोनारे, चंद्रभान साळवे, जनार्दन बोराडे, जिजाबाई गवई, लताबाई तायडे, भगवान शिंदे, गणेश डव्हळे, पुंडलीक गवळी, अर्जुन वायसे, सुशिलाबाई इंगळे, तुळसाबाई बच्छीरे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्याची प्रशासनाने दखल न घेतल्याने ते आज दुसऱ्या दिवशीही सुरु होते.