डुप्लीकेट आधारकार्ड बनवून फुकटे लावतात एसटी.महामंडळाला लाखोचा चूना!

465

1)आधार कार्डावर जन्मतारीख बदलून प्रवाशी करतात बिनधास्त प्रवास
2)आधार नंबर तपासण्याची प्रणाली टिकीट मशीनमध्ये उपलब्धच नाही
3)डुप्लीकेट आधारकार्ड बनवून 60 वर्षांच्या फुकट्यांची संख्या वाढली
4)45 त 50 वयोगटातील प्रवाशी करतात अर्ध्या भाड्यात प्रवास

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (22 FEB.2023) लालपरी आपला डोलारा घेवून खेड्यापातील शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना शाळेच्या ठिकाणी तसेच मुंबई, पुणे, अकोला आदी शहरांच्या ठिकाणी पोहचविते. परंतु एसटी.महामंडळाकडे आधारकार्डवरील बारा अंकी आधार कार्डवर जन्मतारीख बदलविली काय? त्यामध्ये कोणी फोटोशॉप यासह आदी सॉफटवेअरमध्ये बदल केला काय? याची तपासणी प्रणाली उपलब्ध नसल्याने जवळपास 45 ते 50 वर्षातील महिला व पुरुष सर्रासपणे आधारकार्डमध्ये छेडछाड करुन अर्ध्याभाड्यात प्रवास करुन एसटी.महामंडळाला लाखोचा चूना लावत आहे.

एसटी.महामंडळाच्यावतीने 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना फुकटचा प्रवास सुरु केला आहे. परंतु यामध्ये सर्रासपणे अनेक 60 ते 65 वर्षाचे प्रवासी आधारकार्डमधील जन्मतारीखमध्ये फोटोशॉपमध्ये बदल करुन त्याची कलर प्रिंट काढून खुशाल फुकट प्रवास करीत आहे. तसेच 45 ते 50 वर्षाचे अनेक महिला-पुरुष आधारमध्ये 65 वर्षावरील जन्मतारीख टाकून ते अर्ध्याभाड्यात प्रवास करतात. हे सर्व बसमधील वाहकांना माहिती असते, परंतु त्यांचा नाईलाईज असतो. कारण त्या प्रवाश्यांकडे अर्ध्या टिकीटाचा पुरावा म्हणून ते आधारकार्ड दाखवितात. एसटी वाहकांकडे टिकीटासाठी असलेल्या मशीनमध्ये फक्त टिकीट काढण्याचा फॉरमॅट उपलब्ध असल्याने त्यामध्ये वाहकांना शंका आल्यास प्रवाश्याचा आधारकार्डवरचा नंबर टाकला की त्याचे ओरीजनल आधारकार्डचा डाटाबेस उपलब्ध नसल्याने टिकीट देतांना वाहकांचा नाईलाज होतो.

आधार कार्डबाबत वाहकांनी शंका व्यक्त केल्यास भांडणे होतात

प्रवाश्याचे काळेभोर केस, शरीराची चामडी पाहून काही वाहकांना प्रवाश्याचे वय 65 वर्षावरील नसल्याची शंका एखाद्या वाहकाने व्यक्त केल्यास ते फुकटे प्रवाशी वाहकांशी वेळेप्रसंगी भांडणावर येत असल्याचे किस्से सुध्दा घडलेले आहेत. आखीर त्यांचे आधारकार्ड पाहून नाईजास्तव वाहकांना अर्ध्ये टिकीट द्यावे लागते.

20 फेब्रुवारीच्या बसमधील एक प्रकार

सोमवार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास एकबस बुलढाणाकडे चालली होती. दरम्यान मोताळा येथून बुलढाणा जाण्यासाठी आई व मुलगी बसमध्ये बसल्या त्यांनी दोन अर्धे टिकीट बुलढाणा मांगितले वाहक महिलेने त्या दोंघीचे आधारकार्ड पाहिले त्या आधारकार्डवर आईपेक्षा मुलगी फक्त दोन वर्षांनी लहान असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले परंतु त्या वाहक महिलेचा नाईलाज होता. त्यांना टिकीट द्यावे लागले, तशी शंका त्या महिलेने काही प्रवाश्यांकडे व्यक्त सुध्दा केली. यावेळी काही प्रवाशांनी मायलेकीच्या वयामध्ये दोनवर्षाचा फरक असल्याने आश्चर्य व्यक्त करीत धन्य ती माता दुसऱ्यावर्षी आई झाली कशी? असे आश्चर्य व्यक्त करीत त्यांचे नाव ग्रिनीज बुकात नोंदवियाला पाहिजे असा विनोद सुध्दा काही प्रवाश्यांनी केला.

आधारनंबर तपासणी प्रणाली असायला पाहिजे

सध्या डिटीटल यूग आहे, सर्वांचे केवायसी व आधार पॅन कार्ड लिंक झालेले आहे. आधारकार्ड व पॅनकार्डवर जन्मतारीख असल्याशिवाय कोणत्याही बँकेत खाते निघत नाही. परंतु एसटी.महामंडळाकडे वाहक ज्या मशीनमध्ये टिकीट फाडतात त्या मशीमध्ये फुकटचे टिकीट, अर्ध्ये टिकीट देतांना वाहकांना संशय आल्यास आधारकार्डचा डेटाबेस असल्यास संशय आलेल्या फुकट्यांचा आधार नंबर टाकून त्यांचा आधारवरील ओरीजनल जन्मतारीख काय ? अशी माहिती मिळाल्यास एसटी.महामंडळाला महाराष्ट्रामध्ये लाखो-करोडोचा चूना लागणार नाही.