बुलढाण्यातील ऑटो चालकाचे प्राणी प्रेम; कमाईतील 100 रुपये करतात जखमी कुत्र्याच्या खाण्यावर खर्च !

496

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा(1 MAR.2023) आजचे यूग खुप धकधकीचे आहे…प्रत्येकजण हा स्वार्थासाठी जगतो, पैसा कसा व कोणत्या मार्गाने मिळविता येईल, याकडे प्रत्येक स्वार्थी माणसाचे लक्ष लागले आहे. पाच, दहा हजार रुपये कमाई करणाऱ्यांना वाटते, आपण रोज विस हजार रुपये कमवाये, मार्ग कोणताही असो फक्त पैसा यायला पाहिजे. परंतु पाप-पुण्य फक्त मोजकेच लोक जोपासत ते इतरांना मदत करतात. असेच आहेत बुलढाण्यातील 50 वर्षीय ऑटोचालक रमेश दांडगे ते 27 फेब्रुवारी रोजी ‘बुलढाणा न्यूज अपडेट’ प्रतिनिधी यांना सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर जखमी झालेल्या कुत्र्यासाठी आपल्या कमाईतले दररोज 100 रुपये ब्रेड व अंडीवर खर्च करीत असल्याचे ‘सत्य वास्तव’ आढळून आले, त्याचा हा वृत्तांत!

रमेश दांडगे हे बुलढाण्यात क्रीडा संकूल गजानन नगर येथे राहतात. ऑटो चालवून ते पत्नी व 2 मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह करतात. ऑटोवरच त्यांची रोजीरोटी चालते, परंतु मनामध्ये दया, मया असल्याने त्यांना अंदाजे 5 ते 6 महिन्यापूर्वी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेला कुत्रा चिखलात पडलेला दिसला. त्यावेळी रमेश दांडगे यांचे प्राण्याविषयी असलेले प्रेम व त्याला संकटातून बाहेर काढण्याची इच्छा अंतरुणी मनात जागृत झाली आणि त्यांनी अपघात झालेल्या कुत्र्याला बाहेर काढीत त्याच्यावर उपचारकरुन त्या कुत्र्याला जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाजवळील कॉर्नरच्या बाजूला ठेवले आहे. त्या कुत्र्याला ते कधी अंडी, दूध व पाव तसेच इतर लहान पिल्लावर ते आपल्या ‘कष्टाच्या’ कमाईतील जवळपास 100 रुपये दररोज खर्च करतात., हे विशेष!

सलाम आहे दांडगेंच्या कर्तृत्वाला
रमेश दांडगे हे तसे सर्वसामान्य म्हणजे गरीब कुटुंबातील, ऑटोवर कुटुंबीयांचा खर्च चालतो. दांडगे हे आपल्या ऑटोच्या कमाईमध्ये समाधानी असून ते आपल्या कमाईतील 100 रुपये 6 महिन्यापसून जखमी असलेल्या कुत्रा व इतर पिल्लांच्या ब्रेड व अंडीवर खर्च करतात, अशी माणसे या जमान्यात क्वचीतच आळढून येतात, सलाम आहे अशा माणसांच्या कार्य कर्तृत्वाला!