BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (24 Mar.2023)भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ मोताळा तालुका काँग्रेस व युवक काँग्रेस आक्रमक झाली असून आज 24 मार्च रोजी मोताळा फाटा येथे दुपारी 12 वाजेच्या सुमारास साखळी ‘जेल भरो’ आंदोलन केले. यावेळी विविध घोषणाजी करुन परिसर दणाणून सोडला होता. बोराखेडी पोलिसांनी आंदोलन कार्यकर्त्यांना स्थानबध्द करुन बोराखेडी पोस्टे.ला नेवून नंतर सोडून देण्यात आले.
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.राहुल गांधी यांनी सगळ्या चोरांचे आडनाव हे मोदी का असते? त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर दाखल मानहानीच्या प्रकरणात त्यांना सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरविले असून 2 वर्षाची शिक्षा सुनाविली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ मोताळा तालुक्यात तालुका व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध घोषणाबाजी करुन राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध नोंदवून जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे Adv.गणेशसिंग राजपूत, तुळशीराम नाईक, गणेशराव पाटील, तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, एकनाथ खर्चे, संजय किनगे, प्रकाश बस्सी, साहेबराव डोंगरे, उषाताई नरवाडे, रवि पाटील, निना इंगळे, शिवाजीराव बोराडे, अमर कुळे, अतिश इंगळे, विशाल बावस्कर, श्रीकृष्ण खराटे, अभिजीत खाकरे पाटील, आबित कुरेशी यांना बोराखेडी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना स्थानबध्द करुन नंतर सोडून दिले.
आंदोलन चिघळणार काय?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने पुढे हे आंदोलन चिघळेल का? काँग्रेस आता कोणती भुमिका घेते? राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध नोंदविला!
मलकापूरातही काँग्रसचे ‘जेल भरो’ आंदोलन
मलकापूर-गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्या निषेधार्थ मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आज 24 मार्च रोजी निेषेध नोंदवून मलकापूर येथील तहसील चौक येथे मोदी सरकारचा विरोधात नारेबाजी करून जेल भरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायणदास निहलानी, सोपान शेलकर, हाजी रशिदखा जमादार, हरिषभाऊ रावळ, मंगलाताई पाटील, शिरीषभाऊ डोरले, राजेंद्र वाडेकर, बंडू भाऊ चौधरी, राजुभाऊ पाटील, प्रमोद दादा अवसरमोल, अनिल गांधी, तुषार पाटील, आनंद पुरोहित, ज्योतीताई धोरण, पंचकुला पाटील, कल्पनाताई पाटील, प्रीतीताई भगत, अनिल मुंधोकार, संभाजी शिर्के, सिद्धांत इंगळे, सलीम कुरेशी, किसन पाटील, दिलीप गोडीवाले, अशोक मराठे, कैलास काळे यांच्यासह काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.