अ‍ॅपे व कारची धडक; 2 जण गंभीर

248

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (21 Mar.2023)तालुक्यातील जांब गावाजवळी दर्ग्याच्या जवळ इंडीगो कार व अ‍ॅपेची समोरासमोर धडक झाली. यामध्ये अ‍ॅपेचा अक्षरश: चुराडा होवून अ‍ॅपेमधील 2 जण गंभीर जखमी असून त्यांना बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात आज 21 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडला.

छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या जांब गावाजवळील दर्गाच्या जवळ माहोरा गावाकडून येणाऱ्या भरधाव इंडीगो कार एम.एच.२८ व्ही.६१३९ व धाडकडून माहोरा जाणाऱ्या अ‍ॅपे क्र.एम.एच.२१ एम.२९७४ यांच्यामध्ये आज 21 मार्च रेाजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाल्याने अ‍ॅपेचा चुराडा झाला. यामध्ये अ‍ॅपेमधील मंगेश साबळे रा.माहोरा व अजित बावस्कर रा.मौढांळा हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच धाड पोस्टे.चे पीएसआय.परमेश्वर केंद्रे घटनास्थळीजावून माहिती घेतली.