तिर्थक्षेत्र महादेव संस्थान टाकळी येथे सोमवारपासून संगीत शिवपुराण कथेचे आयोजन ! !

257

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (25 Mar.2023) तालुक्यातील टाकळी(वाघजाळ) येथील तिर्थक्षेत्र महादेव संस्थान येथे सोमवार 27 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान अखंड हरीनामसंकिर्तन व संगीत शिवपुराण सप्ताहाचे आयोजन हभप.वासुदेव शास्त्री महाराज वाघजाळ आश्रम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आले आहे. कथावाचन हभप.संदीप महाराज सिरसोदा (म.प्र.) हे करणार आहे. 3 एप्रिल रोजी काल्याच्या किर्तनाचे कथेची सांगता करण्यात येणार आहे.

अखंड हरीनाम सप्तहात सकाळी 5 ते 6 काकडा आरती, 6 ते 8 सहस्त्रनाम, सकाळी 9 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते 5 शिवपुराण कथा, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ होणार आहे. तर रात्री 8.30 ते 10.30 दरम्यान सोमवार 27 मार्च रोजी हभप.चांगदेव महाराज पिंपळखुटा यांचे किर्तन आयोजीत करण्यात आले आहे. 28 मार्चला हभप.प्रभाकर महाराज धरणगाव कुंड, 29 मार्चला हभप.गजानन महाराज धानोरा ता.यावल, 30 मार्च रोजी हभप.कु.रुपालीताई पळशी बु.ता.अकोला, तसेच हभप. संदीप महाराज सिरसोदा यांचे 30 मार्च रोजी रामजन्माचे किर्तन राहील, 31 मार्च रोजी हभप.शिवदास महाराज पिंप्राळा, 1 एप्रिल रोजी हभप.वासुदेव शास्त्री महाराज वाघजाळ आश्रम, 2 एप्रिलला हभप.कडुदासजी महाराज भोजने कुऱ्हा काकोडा यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. 3 एप्रिल रेाजी हभप.संदीप महाराज सिरसोदा मध्यप्रदेश यांचे सकाळी 10 ते 12 काल्याचे किर्तन आयोजीत करण्यात आले आहे. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. गायनाचार्य म्हणून हभप.गजानन महाराज मानकर(बोराखेडी),गणेश महाराज सुरडकर (अंत्री),हभप.सुदाम पाटील, अवचितराव पाटील, विठ्ठल महाराज पाटील, एकनाथ पाटील (शिरवा) हे तर चोपदार म्हणून शिवाजी महाराज चहाकर (बोराखेडी) तसेच मृंदगाचार्य म्हणून धिरज महाराज अढाव शिरसोडी हे सेवा देणार आहे. या अखंड हरिनामसंप्ताहाचा पंचक्रोशीत भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र धर्माळ संस्थान टाकळी व समस्त गावकऱ्यांच्यावतीने करण्यात आले आहे.