303 पर एक ‘अकेला शेर’ भारी!

363

बुलढाण्यात काँग्रेसने नोंदविला मोदी सरकारचा निषेध!

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (25 Mar.2023)भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर सूड भावनेतून केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ संपूर्ण देशभर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून मोदी सरकारच्या कृत्याचा निषेध करीत आहे. आज 25 मार्च रोजी बुलढाणा राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड.संजय राठोड यांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौक बुलढाणा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करुन, नही चलेंगी, नही चलेंगी तानाशाही नही चलेंगी, मोदी सरकार मुर्दाबाद, राहुल गांधी तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणाबाजी देवून निषेध नोंदविला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अ‍ॅड.संजय राठोड यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे SC विभागाचे उपाध्यक्ष मा.विनोदभाऊ बेंडवाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कवडीचे वक्त विभागाचे समन्वयक मा.रवीभाऊ पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शेतकरी विभागाचे उपाध्यक्ष मा.चित्रांगणभाऊ खंडारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे व्व्हीजेएसटी विभागाचे सरचिटणीस प्रमोदभाऊ जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला उपाध्यक्ष प्राध्यापक सौ.मीनलताई आंबेकर ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष मा. मोहीनभाई काजी, जिल्हा एनएसयुआयचे शैलेशभाऊ खेडकर, बुलडाणा काँग्रेस कमिटीचे व्हीजेएनटी विभागाचे अध्यक्ष एकनाथभाऊ चव्हाण, सय्यदभाई इरफान, दीपक रिढे, सतीश महेंद्र, सुनील सपकाळ, दत्ता काकास, सुनील तायडे, विठ्ठलभाऊ चव्हाण, बंडूभाऊ काळवाघे, प्रमिलाताई गवई, गौतमभाऊ मोरे, झाकीरभाई कुरेशी, सुनील पणपालिया, अनिल वारे, साहेबराव डोंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.

हा तर भारतात हुकूमशाही आणण्याचा प्रकार-अ‍ॅड.संजय राठोड

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात केलेली कारवाई ही केंद्र सरकरच्या इशाऱ्यावर करण्यात आली आहे. ही हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचे यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड.संजय राठोड म्हणाले. देशात महापुरुषांचा अपमान करणारे सोडून दिल्या जातात मात्र चोरांना चोर म्हणणाऱ्यांना शिक्षा दिली जाते. सदर प्रकार म्हणजे लोकशाही संपुष्टात आणून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रकार असल्याचा घाणाघाती आरोप करीत दहशत व भीतीचे राजकारण जास्त दिवस चालणार नाही, हिटलरचा सुद्धा अंत झाला होता.,शा शब्दात संजय राठोड यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदविला.