गरीब मराठ्यांना आरक्षणासह विविध न्याय्य मागण्यांसाठी वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन!

300

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (27Mar.2023) गरीब मराठा आरक्षण संविधानीकरीत्या लागू करण्यात यावे, ओबीसी जातीनिहाय जणगणना करण्यात यावी, आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी वचिंत बहुजन आघाडी यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार 27 मार्च रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत एक दिवशीय चेतावणी धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले, यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी प्रशासनाने न्याय्य मागण्यांचा विचार न केल्यास ठोकमोर्चाचे आयोजन करण्याचा इशारा जिल्हाप्रशासनास दिला आहे.

आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, परंतू जिल्ह्यामधील नविन गावांच्या जयंती संदर्भात परवानगीसाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत, त्या गावांना जयंती साजरी करण्याची परवानगी तात्काळ देण्यात यावी, मोहमंद पैंगबर बिल तात्काळ लागू करण्यात यावे, रमाई घरकुल आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थांची जागा तात्काळ नियमानूकुल करुन घरकुलाचा निधी वाढवून सरसकट २.५० लाख देण्यात यावे, गायरान जमिनीचे पट्टे त्वरीत कायमस्वरुपी लाभार्थांच्या नावावर करण्यात यावे, शासकीय-निमशासकीय राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, जिल्हा केंद्रीय बँकेची सक्तीची वसूली थांबवून सर्व कर्जावरील व्याज सरसकट माफ करण्यात यावे, सन २०२१ मधील गारपीट व अवकाळी पाऊस २०२३ मधील गारपिटी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची सरसकट तात्काळ भरपाई देण्यात यावी, धोत्रानंदई गावच्या शिवारातील सगळ्या शेतीला खडकपूर्णा धरणाचे पाणी देण्यात यावे, जिल्ह्यातील बौंद्ध विहाराच्या जागेवर सभामंडप व संविधान भवन देण्यात यावे, सुशिक्षीत व बेरोजगार विद्यार्थ्यांना महामंडळामार्फत लघु उद्योगासाठी त्वरीत कर्ज स्वरुपी आर्थीक मदत करण्यात यावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतंर्गत ज्या योजनेसाठी जाचक अटी आहेत त्या जाचक अटी रद्द करुन त्यांना आणि सरसकट विहिरी देण्यात याव्यात, स्वाधार योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय हॉस्टेलला नंबर लागला नाही त्यांना जे वार्षिक मानधन मिळते ते वर्षाच्या आत देण्यात यावे, आदी मागण्यांची पुर्तता करण्यासाठी एक दिवसीय चेतावणी धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये सतीश पवार जिल्हा युवा अध्यक्ष, विष्णु उबाळे महासचिव, शेषराव मोरे, वासुदेव वानखेडे,विशाल गवई महासचिव युवा आघाडी, राजु वाकोडे, प्रविण खरात, गणेश इंगळे, निलेश गवळी, विलास क्षिरसागर, कैलास सुरळकर, इंदुबाई जाधव, आत्माराम चवरे, दिनकर बावस्कर, रेखा शिरसाठ, संजय खराटे जितेंद्र निकाळजे, रेखा सिरसाठ, कविता भगत, आशा आघाम, कौशल्या सुरडकर, संजय जाधव, ध्रुपदाबाई गुजर, तेजराव जाधव, गणेश इंगळे, विशाल गवई, यांच्यासह या आंदोलनामध्ये शेकळो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यांनी केले मार्गदर्शन
वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या धरणे आंदोलनामध्ये जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, Adv.अमर इंगळे, अशोकसिंग सुरळकर, विद्याधर गवई, आबाराव वाघ ,महेन्द्र पन्हाळ, संजय धुरंधर, उध्दव वाकोडे, शेख मोबीन, दिलीप राठोड, समाधान डोंगरे, बाळु भिसे, मनोज खरात याच्यासह काही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.