बुलढाणा विधानसभा मतदार संघात घाटावरील नेत्यांनाच मतदारांची प्रथम पसंती !

546

~घाटाखालील 3 तर घाटावरील 9 आमदारांना मिळाली संधी
~सन 2024 मध्ये सुध्दा घाटावरचेच आमदार असतील
~लिड घाटखालीलच; परंतु सक्षम नेतृत्वच नाही ?
~मुक्त्यारसिंग राजपूत यांचा पक्षातंर्गत कलहामुळे पराभव झाल्याची होती, चर्चा?

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (7.May.2023) बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये राजकारण घाटावरील नेत्यांकडेच असल्याचा प्रत्येय समोर येत आहे. पुर्वी मोताळा तालुका मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये होता. त्यानंतर मोताळा तालुका बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये समाविष्ट झाल्यापासून या मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवाराला संधी मिळालीच नाही. सक्षम नेतृत्व घाटावरील नेत्यांकडे असल्यामुळे घाटाखालील फक्त तीन आमदारांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली, तर घाटावरील 9 आमदारांना मतदारांनी निवडून दिल्याचा इतिहास आहे. सन 2024 च्या निवडणुकीसाठी घाटाखाली सक्षम नेतृत्व, दांडगा जनसंपर्क असलेला नेता नसल्याने आमदार कोणत्याही पक्षाचा असो तो घाटावरीलच राहील, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही !

बुलढाणा मतदार संघामध्ये सर्व गटातटाचे राजकारण घाटावरील नेत्यांचेच, घाटाखाली फारसे गट-तट नसून ‘आधे इधर आधे उधर’ अशी परिस्थीती आहे. काँग्रेस पक्ष सोडला तर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा कोणत्याही पक्षाने घाटाखालील नेतृत्वाला आमदारकीचे टिकीट दिले नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुक्त्यारसिंग मोरे (राजपूत) यांना काँग्रेसने सन 2004 मध्ये सन 2000 चे विद्यमान आमदार धृपतराव सावळे यांचे टिकीट काटून टिकीट दिले, परंतु आखरी नाराजांचा संख्या वाढल्याने काही नाराजीच फळी निर्माण होवून अखेर मुक्त्यारसिंग राजपूत यांना 40908 मते मिळाल्योन द्वितीयस्थानी रहावे लागले होते, तर शिवसेनेचे घाटावरील विजयराज शिंदे यांनी 55546 मते घेवून 14 हजार 638 मतांनी त्यांना पराभूत केले होते. त्यावेळी कदाचीत घाटाखाली पक्षातंर्गत कलह झाला नसतातर मुक्त्यारसिंग राजपूत यांना बुलढाणा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली असती. त्यावेळी ज्यांनी कलह निर्माण केला होता, त्यांचे त्यानंतर पक्षात फारसे वर्चस्व व त्यांना राजकारण करता आले नाही, अशी घाटाखाली चर्चा सुध्दा होतांना दिसते.

घाटाखालील फक्त तीनच आमदार !

बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये पहिल्यांदा बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी 1967 मध्ये सुमनताई शिवाजीराव पाटील यांना मिळाली होती, त्यांनी 27016 मते घेवून विजयीश्री खेचून आणली होती, त्यावेळी त्यांनी अेव्हीएल.सेठ यांचा पराभव केला होता, सेठ यांना 18849 मते मिळाली होती. शिवाजीराव भिकू पाटील तपोवन यांनी सन 1978 च्या निवडणुकीमध्ये 35503 मते घेवून विजयश्री खेचून आणली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आत्माराम तोताराम पवार यांना 26152 मते मिळाली होती. शिवाजीराव पाटील यांना राज्यमंत्रीपद सुध्दा मिळाले होते. सन 1980 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सखाराम विठोबा अहेर यांना मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती, त्यावेळी त्यांनी 33143 मते घेवून विजयश्री खेचून आणली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजीराव पाटील यांना 28299 मते मिळाल्याने पराभव स्वीकारावा लागला होता. सन 1985 च्या विधानसभा निवडणुकीत सुमनताई शिवाजीराव पाटील यांचा विठोबा सोनाजी पाटील यांनी 4427 मतांनी पराभव केला होता, त्यावेळी विठोबा पाटील यांना 36277 तर सुमनताई पाटील यांना 31850 मते मिळाली होती.

घाटावरील 9 आमदारांना मिळाली संधी !

बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये सन 1962 च्या निवडणुकीमध्ये इंदिराबाई रामराव कोटंबकार ह्या 18266 मते घेवून निवडूण आल्या होत्या, त्यावेळी घाटाखालील मोताळा तालुक्याचा समावेश नव्हता. सन 1972 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रामसिंग देवसींग भोंडे यांनी 30540 मते घेवून विजयी झाले होते. सन 1985 मध्ये विठ्ठल सोनाजी पाटील यांना 36277 मते मिळाली होती, सन 1990 मध्ये राजेंद्र व्यकटराव गोडे यांना 43244 मते मिळाली होती. सन 1995 मध्ये विजयराज हरीभाऊ शिंदे 48842 मते मिळाली होती. सन 1999 मध्ये धृपतराव सावळे यांना 42079 मते मिळाली होती, सन 2004 मध्ये विजयराज हरीभाऊ शिंदे यांना 55546 मते मिळाली होती. सन 2009 मध्ये विजयराज हरीभाऊ शिंदे यांना 66254 मते मिळाली होती, सन 2014 मध्ये हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांना 46985 मते घेतली होती, सन 2019 मध्ये संजय रामभाऊ गायकवाड यांनी 67785 मते घेवून विजयी झाले, म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये घाटावरील 9 आमदारांना मतदारांनी प्रथम पसंदी देवून निवडून दिले, हे विशेष !

घाटाखालील नेत्यांचे अस्तीत्व काय ?

बुलढाणा मतदार संघामध्ये सर्व गटातटाचे राजकारण घाटावरच्यांच नेत्यांचे, घाटाखालील नेत्यांना राजकीय पक्षांनी मोठे होवूच दिले नाही, अशी ओरड आहे. नेतेही निमूटपणे घाटावरील नेत्यांचेच अस्तीत्व मान्य करुन त्या नेत्यांनाच घाटाखालून लीड दिल्या जातो. बहुसंख्य पतसंस्था सुध्दा घाटावरील नेत्यांच्याच ! घाटाखालील सक्षम नेतृत्व नाही का? घाटाखालील नेत्यांचे अस्तीत्व काय? असे प्रश्न काही सुज्ज्ञ नागरिकांकडून उपस्थित केल्या जातात, जसे आकाशात रात्रभर शेकडो तारे, चांदण्या दिवसा काहीच नाही, त्याप्रमाणे !