मलकापूर तालुक्यात 3.4 इंच तर नांदुऱ्यात 2 इंच पावसाची नोंद !
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (20.JULY.2023) जिल्ह्यामध्ये यावर्षी 20 जुलै सकाळी 8 वाजेपर्यंत 3281.6 मि.मी. पाऊस झाला आहे. तो मागील वर्षाच्या तुलनेत 1208 मि.मी.एवढा कमी आहे. 19 जुलै रोजी पावसाने मोठे थैमान निर्माण केले होते. नैसर्गीक आपत्ती विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये 262.9 मि.मी.म्हणजे 10 इंच पाऊस झाला असून मलकापूर तालुक्यात 3.4 इंच तर नांदुरा तालुक्यात 2 इंच पावस झाला आहे.
मागीलवर्षी पावसाने जून महिन्यातच हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, परंतु यावर्षी पावसाचे उशीरा आगमन झाल्याने जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना पेरण्या कराव्या लागल्याने पीके जेमतेम आहेत. 19 जुलै रोजी पावसाने थैमान घातल्याने मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी 20 जुलैपर्यंत 4489.9मि.मी. म्हणजेच 176.6 इंच पाऊस झाला होता. तर यावर्षी 3281.6 मि.मी. एवढा म्हणजे 129 इंच एवढा असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 47.5 इंच कमी आहे. तर 20 जुलैपर्यंत बुलडाणा तालुक्यात 186.7 मि.मी.पाऊस झाला असून त्याची टक्केवारी 21.70 टक्के एवढे आहे. तर चिखली तालुक्यात 212.2मि.मी. त्याची टक्केवारी 27.20टक्के, देऊळगाव राजा तालुक्यात 233.2 मि.मी.33.10 टक्के, सिंदखेड राजा तालुक्यात 263.6 मि.मी.त्याची टक्केवारी 32.87, लोणार तालुक्यात 275.6 मि.मी. त्याची टक्केवारी 31.58, मेहकर तालुक्यात 258.6 मि.मी.त्याची टक्केवारी 30.83टक्के, खामगाव तालुक्यात 223 मि.मी.त्याची टक्केवारी 31.13, शेगाव तालुक्यात 326.9 मि.मी.त्याची टक्केवारी 47.90, मलकापूर तालुक्यात 381.3 मि.मी.त्याची टक्केवारी 54, नांदुरा तालुक्यात 260.7 मि.मी. त्याची टक्केवारी 34.93, मोताळा तालुक्यात 209.4 त्याची टक्केवारी 29.39, संग्रामपूर तालुक्यात 217.1 मि.मी.त्याची टक्केवारी 28.31, जळगाव जामोद तालुक्यात 233.5 मि.मी.त्याची टक्केवारी 33.02 टक्के एवढी आहे.
3 मोठ्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा
जिल्ह्यात 3 मोठे प्रकल्प असून मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणाचा संकल्पीत पाणीसाठा 69.32 एवढा असून आजरोजी 18.14 द.ल.घ.मी.पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 26.18 एवढी आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा संकल्पीत पाणीसाठा 93.40 एवढा असून त्यामध्ये 0.60 पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 0.64 एवढी आहे. तर पेनटाकळी प्रकल्पाचा पाणीसाठा 59.97 असून त्यामध्ये 26.55 पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 44.27 टक्के एवढी आहे. तर नळगंगा धरणात 2.54 द.ल.घ.मी. मृतसाठा असून खडकपूर्णा धरणात 67.20 द.ल.घ.मी. , पेनटाकळी धरणात 7.38 द.ल.घ.मी. मृतसाठा उपलब्ध आहे.