मोताळा तालुक्यातील पोफळीतील विष्णु शिंदे मेहकर येथे बसच्या धडकेत ठार !

65

‘त्या’ बस चालकावर मेहकर पोस्टे.ला गुन्हा दाखल

BNU(न्युज नेटवर्क)
मेहकर (20JULY2023) एस.टी.बस प्रवाशांना सुरक्षेची हमी देते, तर दुसरीकडे चालक बेफाम बस चालवित असल्यामुळे रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना जीव गमगावा लागतो. अशीच एक घटना मेहकर येथे 18 जुलै रोजी घडली असून त्यात मोताळा तालुक्यातील पोफळी येथील 64 वर्षीय विष्णु तुकाराम शिंदे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामा शिंदे यांच्या फिर्यादीवरुन बसचालक अशोक वानखेडे यांच्यावर मेहकर पोस्टे.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोताळा तालुक्यातील पोफळी येथील रामा श्रीराम शिंदे यांनी मेहकर पोस्टे.दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे चुलतबंधू विष्णु तुमाराम शिंदे (वय 64) रा.शर्मा ले-आऊट हे सहा वर्षापुर्वी नगर पालिका मेहकर येथून सेवानिवृत्त झाले होते. 18 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांचा लहान भावाला मेहकर येथील संतोष राणे यांनी विष्णु शिंदे हे रात्री 8 वाजता मेहकर बसस्टॅण्ड येथून घराकडे दूध घेवून जात असतांना त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. एसटी.बस क्र.एम.एच. 06-एस-8404 चालक अशोक मारोती वानखेडे भिम नगर वार्ड क्र.2 बुलढाणा याने भरधाव बस चालवून विष्णू शिंदे यांना धडक दिल्याने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची रामा शिंदे यांच्या फिर्यादीवरुन मेहकर पोस्टे.ला चालक अशोक वानखेडे यांचावर भादंवीचे कलम 279, 304 A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.