ट्रॅक्टरने एसटी.बसला ठोकले; सुदैवाने प्रवाशी बचावले !!

16

रोहिणखेड रोडवरील घटना; एसटीचे प्रचंड नुकसान !

मोताळा: एसटी.महामंडळाचे चालक आपली बस तसे नियमात राहूनच चालवितात. मात्र, तालुक्यातील रोहिणखेड येथे चालकाने भरधाव ट्रॅक्टर चालवून एसटी.ला जबर धडक दिली. या धडकेत बसटी.बसचे 18 ते 19 हजाराचे नुकसान झाले. बसमध्ये 15 प्रवाशी होते. सदर घटना 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने जिवीतहानी टळली.

सुखेदव नारायण सिरसाठ हे आपली एसटी.बस क्र.एम.एच.40 एन-8786 बुलढाणा येथून धा.बढेकडे घेवून जात असतांना 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास बस रोहिणखेड पुलाजवळ पोहचली. त्यावेळी मोहम्मद रईस मोहम्मस मोसीन रा.रोहिणखेड याने आपले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर क्र.एच.एच.28 क्यु.9035 भरधाव वेगाने चालवित एसटी.बसला समोरुन जबर धडक दिली. धडक एवढी जबर होती की, या धडकेत चालकामागील भाग तसेच तसेच मागील बाजुचे 18 ते 19 हजाराचे नुकसान झाले. अशा चालक सुखेदवे सिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी मोहम्मद रईस मोहम्मद मोसीन याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 281, 324, (2), (3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ.गजानन पाटील हे करीत आहे.

बसमध्ये होते 15 प्रवाशी
बसमध्ये 15 प्रवाशी होते. एसटी बसला ट्रॅक्टरने जबर धडक दिली. या धडकेत एसटीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. चालक व वाहनाने सायंकाळचा वेळ असल्याने पर्यायी बसमध्ये प्रवाशांना मार्गस्थ केले.