Wednesday, May 6, 2026
Home Buldana मोताळ्यात फटाके फोडण्याच्या वादातून हाणामारी !

मोताळ्यात फटाके फोडण्याच्या वादातून हाणामारी !

87

बुलढाणा: मोताळा शहरात फटाके फोडण्याच्या कारणावरुन वाद होवून हाणामारी झाली. सदर घटना शुक्रवार १ नोव्हें.च्या रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

शेख सोहेल शेख रफीक यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, तो घराजवळ उभा असतांना लहान मुले फटाके फोडत होते. त्यांना येथे फाटाके का फोडता, असे म्हणत शेख बुढन शेख उमर हा शिविगाळ करीत होता. तिथे फिर्यादीची आई आली. त्यांनी शिविगाळ का करता, असे विचारले असता शेख सलमान शेख बुढन, शेख हुसेन शेख निकन, शे शहीद शेख रशीदा यांनी फिर्यादीच्या पाठीवर, डोक्यात लाठी-काठीने मारहाण केली.तसेच फिर्यादीच्या आईला शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त चौघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८(१), ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.

Don`t copy text!