मोताळा-नांदुरा रोडवरील आडविहिर फाट्याजवळील घटना
मोताळा : दुचाकीच्या अपघातामध्ये तालुक्यातील अंत्री येथील २ युवक जागीच ठार झाले. सदर दुदैवी घटना १४ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान मोताळा-नांदुरा रोडवरील आडविहिर फाट्याजवळ घडली. मृतकाचे नाव अतुल जवरे व गोपाल काठोळे असे आहे.
प्राप्त माहितीनुसार अंत्री येथील अतुल गजानन जवरे (वय ३१) व गोपाल भगवान काठोळे (वय २१) हे दोघे १४ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते १० वाजेच्या सुमारास मोताळा येथून नांदुNयाकडे जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीचा आडविहिर फाट्याजवळ अपघात झाला. यामध्ये अतुल जवरे व गोपाल काठोळे हे दोघेही जखमी गंभीर झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे.चे पोहेकाँ.नंदकिशोर धांडे व बरडे हे घटनास्थळी पोहचले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषीत केले. आज रविवार १५ डिसेंबर रोजी अतुल जवरे याच्यावर दुपारी १ वाजेच्या सुमारास शोकावूâल वातावरणा अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल व गोपालच्या अपघाती जाण्याने अंत्री गावावर शोककळा पसरली आहे. या दोघांचा अपघात कसा झाला? त्यांना कोणत्या अज्ञात वाहनाने उडविले का? हे मात्र समजू शकले नाही.