मोताळा तालुक्यातील कोथळी येथील 15 वर्षीय मुलाचे अपहरण

4321

तालुक्यात मुले चोरी करणारी टोळी तर सक्रीय नाही ना ??
मोताळा (BNU न्यूज) सध्या मुले चोरणाऱ्या टोळ्या सक्रीय असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मिडीयावर रंगत आहे. काही ठिकाणी मुले चोरणारे समजून अनेक निरपराधांना नागरिकांनी चोप दिल्याच्या घटना सुध्दा बुलडाणा जिल्ह्यात घडल्या. परंतु मोताळा तालुक्यातील कोथळी येथील 15 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली 15 सप्टेंबर रोजी घडली असून याबाबत, शेख सादीक शेख रहीम यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शेख सादीक शेख रहीम कोथळी यांनी बोराखेडी पोस्टे.ला फिर्याद दिली आहे की, त्यांचा 15 वर्षीय मुलगा शेख समीर शेख सादीक हा 15 सप्टेंबर रोजी फिर्यादी सकाळी 9.30 वाजता काही कामानिमीत्त घरचा बाहेर केले होते. दरम्यान समीर हा घरीच होता दुपारी 12 शेख सादीक हे इलेक्ट्रीक पोलवर काम करीत असल्याना त्यांना मुलगा तरोडा रस्त्याने जाताना दिसला. परंतु कामात असल्याने सादीक आपल्या मुलाशी बोल शकले नाही. दुपारी 12.30 सादीक यांनी मुलाबाबत त्यांच्या पत्नीला विचारले असता, समीर हा गोल्डन हॉटेलवरुन येतो, असे म्हणून निघून गेल्याचे सांगितले. शेख सादीक यांनी मुलाचा कोथळीसह आजुबाजुच्या गावात शोध घेतला असता त्यांना खलील खान गुलजार खान यांनी समीर 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान वाघजाळ रोडने गावातील अमोल वाघोदे हे दिसले मी समीर याला विचारले असता समीरने मोताळा येथे चाललो असे सांगून मोताळ्याकडे मोटार सायकल निघून गेले. त्यानंतर त्याचा चार ते पाच दिवस शोध घेतला परंतु तो आढळून आला नसल्याचे शेख सादीक यांनी फिर्यादीत म्हटले असून अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला, सदर फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला अज्ञात आरोपीविरुध्द भादंवीचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोताळा तालुक्यात मुले चोरणारी टोळी तर नाही ना? अशा चर्चांना सोशल मिडीयावर उधाण आले आहे. घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ यशवंत तायडे हे करीत आहेत.

पालकांनी सर्तक रहावे, शिवसेना व युवा सेनेचे आवाहन..
लहान मुलांना पळवून नेण्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात ऐकावयास मिळत आहे. विशेषता 8 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांच्या अपहरणाचे प्रमाण हे जास्त आहे. पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन युवासेनेचे प्रविण शरदचंद्र पाटील यांनी केले असून टोळीरुपी अनोळखी अथवा संशयीत आपल्या जवळपास व परिसरात निदर्शनास येत असतील किंवा असे कृत्य, घटना निदर्शनास आल्यास शिवसेना व युवासेनेचे सहकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रविण पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रविण पाटील मो.9890041309