पिं.सराई येथील शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या!

381

बुलढाणा(BNUन्यूज) बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील एका 45 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून जाफ्राबाद तालुक्यातील आढा शिवारात गळफास घेवून आत्महत्या केली. सदर दुदैवी घटना आज 9 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर विठ्ठल गट असे आहे.

पिं.सराई येथील रहिवासी ज्ञानेश्वर गट यांनी सतीष प्रसाद शुक्ला यांची जमिन हिस्सेवाटीने शेती केली होती. त्या शेतामध्ये गट हे 8 नोव्हेंबर रोजी काम करण्यासाठी शेतीमध्ये गेले होते. ते घरी परत न आल्याने त्यांची सर्वीकडे शोधाशोध केला परंतु ते आढळून आले नाही. ज्ञानेश्वर गट यांचे चूलत भाऊ विशाल गट यांनी आढा शिवरामध्ये त्यांचा शोध घेतला असा त्यांना ज्ञानेश्वर गट हे आज 9 नोव्हेंबर रोजी सागाच्या झाडला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. विशाल गट यांनी याबाबत जाफ्राबाद पोस्टे.माहिती दिली असता, पोहेकाँ. अनंता भुतेकर यांनी घटनास्थळावर धाव घेवून प्रेताचा पंचनामा करून शव पोस्ट मॉर्टमसाठी पाठविले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गट कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शासनस्तरावरुन त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यावर बँकेचे होते 2 लाखाचे कर्ज..

मृतक शेतकरी ज्ञानेश्वर गट यांची सामाईक अडीच एकर शेती आहे. त्या शेतीवर त्यांनी भारतीय स्टेट बँक शाखेचे 2 लाखाचे कर्ज असल्याचे समजते. सदर शेती आई, पत्नी व भावाच्या नावे आहे. कर्ज कसे फेडावे, कुटूंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, 2 भाऊ, पत्नी, 2 मुले असा आप्त परिवार आहे.