वाह..! रे…हा योगायोग? जिजाऊंच्या मुलीवर गलीच्छ भाषेत टिप्पणी करणारे मंत्री अब्दुल सत्तार घेणार आज राजमाता माँ जिजाऊंचे दर्शन!

326

बुलढाणा (BNUन्यूज) खरचं काय हा योगायोग अशी म्हणण्याची वेळ आता बुलढाणा जिल्हावासीयांवर आली आहे. त्याला कारणही तेवढेचे मोठे आहे, एकीकडे शिंदे सरकारमधील एक जबाबदारी व्यक्ती तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्यावर गलीच्छ भाषेत टिप्पणी करुन संपूर्ण जिजाऊंच्या मुलीला अपमानीत आहे. तर दुसरीकडे तेच मंत्री अब्दुल सत्तार आज मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून सकाळी 10 वाजता ते सिंदखेड राजा येथील राजवाड्यात राजमाता माँ साहेब जिजाऊंचे दर्शन घेणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी असलेली युती तोडावी, यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी शिवसेनेने हृदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या मुद्याला बगल दिल्याचा आक्षेप घेवून बंडखोरी केल्याने सेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत जावून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिंदे गटाला आ.अब्दुल सत्तारांची साथ मिळाली होती. त्याच सत्तारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रियाताई सुळे हिदू धर्मीय महिलेवर गलिच्छ भाषेत टिप्पणी करुन महाराष्ट्रातील संपूर्ण स्त्री जातीला अपमानीत करण्याचे काम केले आहे, ते सत्तार भविष्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे व शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेण्याचे काम करतील का? हे सुध्दा एक अनाकलनीय कोडंच आहे.

ज्यावेळी भाजपाने प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती बनण्यासाठी विरोध केला होता, त्यावेळी मात्र, हिेदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाला न जुमानता मराठी भाषीक महिला प्रतिभाताईला पाठींबा देण्याचा निर्णय घेवून
एका महिलेला सन्मान दिला होता, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुश्मनाच्या पत्नीला सुध्दा मोठ्या आदरभावाने साडीचोळी देवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षीत सोडवून दिले होते. त्याच शिंदे गटाची बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या पोस्टरवर लावलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो व त्यांच्या कर्तृत्वाचे मंत्री अब्दुल सत्तारांना भान राहिले नाही का? जर सत्तारांना त्याचे भान नसेल तर ते भविष्यात बाळासाहेबांचे विचार पुढे नेतील का? असा प्रश्न सुध्दा या अनुषंगाने उपस्थित होतो.

सत्तारांची हकालपट्टी करा ; राकाँ.आक्रमक
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासांच्या आत मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे दिला आहे. आता पुढे मुख्यमंत्री शिंदे सत्तारांची हकालपट्टी करुन छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना थारा देतात का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

मंत्री सत्तारला जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही..
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुलढाणा येथे निषेघ नोंदवून अब्दुल सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला 7 नोव्हेंबर रोजी सांयंकाळी 5.20 वाजता संगम चौक येथे जोडे मारो आंदोलन करुन पुतळा फुकला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री अब्दुल सत्तारांना जिल्हात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. मात्र आज 8 नोव्हेंबर रोजी सत्तार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने राष्ट्रवादी आज काय पावले उचलतात की, ऐनवेळी दौरा रद्द होतो, याकडे बुलढाणा जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे.