जिल्ह्यातील 3 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; स्थागुशाचा प्रभार अशोक लांडेकडे!

426

@buldananewsupdate.com
मोताळा (30Dec.2022) जिल्ह्यात नविन पोलिस अधिक्षक आल्यानंतर बदल्यांचे सत्र सुरु होते, अशी चर्चा होत असतांना आज 30 डिसेंबर रोजी आयोजीत आस्थापनाच्या बैठकीमध्ये जिल्हृयातील तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलिस निरीक्षक दिनेश झांबरे यांची जळगाव जामोद ठाणदारपदी तर बळीराम गिते यांची बोराखेडी ठाणेदारपदी तर अशोक लांडे यांची बुलढाणा स्थागुशाच्या प्रभारीपदी नियुक्ती आली आहे, तसे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षकांनी आज पारीत केले आहेत.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक असतांना बळीराम गिते यांनी जिल्हाभर विविध कारवाया करुन गुन्हेगारावर वचक निर्माण केला होता. त्यांनी अनेक गुन्ह्यातील आरोपींना गजाआड केले होते. तर त्यांच्या पाठोपाठ अशोक लांडे यांनी सुध्दा चिखलीचे ठाणेदार असतांना धडाकेबाज कारवाई करीत गुन्हेगारांना सडो की पडो करुन सोडले होते. आज शुक्रवार 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 अन्वये प्रख्यापीत महाराष्ट्र पोलिस सुधारणा अध्यादेश 2015 मधील कलम 22(न)अन्वये अधिकारांचा वापर करुन जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांनी जिल्हृयातील तीन पोलिस निरिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये कल्याण शाखा बुलढाणा येथील पोलिस निरीक्षक दिनेश झांबरे यांची जळगाव जामोद ठाणेदारपदी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांची बोराखेडी ठाणेदापदी तर चिखली ठाणेदार अशोक लांडे यांची स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे, तसे आदेश पोलिस अधिक्षकांनी पारित केले आहेत.