नांदुरा तालुक्यात विपरीत घडलं; कर्जबाजारीला कंटाळून पती-पत्नीने जीवन संपविलं!

407

@buldananewsupdate.com
मोताळा(29Dec.2022) काय दैना, शेतात राबराब राबतो, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, निसर्ग साथ देत नाही. शेतीला लावलेला खर्च निघत नाही. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, बँकेचा कर्जाचा तगादा त्यातच खाजगी कर्ज कसे फेडावे या विवचंनेतच नांदुरा तालुक्यातील बेलूरा येथील एका वृध्द पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज 29 डिसेंबर रोजी सकाळी बेलूरा येथे उघडकीस आली. मृतकाचे नाव सौ.सरलाबाई वसंत डामरे व वसंत जगदेव डामरे असे आहे.

बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या व बेलुरा ता.नांदुरा येथे वसंत डामरे ( वय 70) व सौ.सरलाबाई वसंत डामरे (वय 65) हे आपल्या मुलासोबत राहत होते. यांचेकडे 2 एकर शेती असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. अत्यल्प शेती पत्नीच्या आजाराला लागलेला खर्च तसेच महाराष्ट्र बँक शाखा शेंबाचे कर्ज, शेतीला लावलेला खर्च निघाला नाही. कुटुंबातील 5 ते 6 जणांचा उदरनिर्वाह कसा करावा, कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच सरलाबाई डामरे व वसंत डामरे यांनी 28 डिसेंबरच्या रात्री विषारी औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली सदर दुदैवी घटना आज सकाळी 6.50 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण डामरे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला मर्ग दाखल करण्यात आला. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.