सोमवारी बुलढाण्यात लव्ह-जिहाद कायद्याच्या मागणीसाठी हिंदुंचा ‘जन आक्रोश’!

526

मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे-हभप.दामुअण्णा महाराज

@buldananewsupdate.com
बुलढाणा(30 Dec.2022) लव्ह-जिहाद, वाढते धर्मांतरण आणि वाढत्या गोहत्या विरोधात तसेच समस्त हिन्दूंचे आराध्य दैवत, हिंदुवी स्वराज्य संस्थापक छत्रपति श्री शिवाजी महाराजांचा व राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याच्या विरोधात कायदा व्हावा यासह आदी न्याय्य मागण्यांसाठी हिंदुंचा हिंन्दुंसाठी जिल्हास्तरीय ‘हिंदू जन आक्रोश’ महामोर्चा 2 जानेवारी रोजी निघणार आहे. या मोर्चाला लाखोच्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप.दामुअण्णा महाराज शिंगणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

जन आक्रोश मोर्चाला धनंजय भाई देसाई व कालीचरण महाराज यांच्यासह हभप.बाबुराव महाराज वाघ पंढरपूर, संतोष सिंह गहेरवाल अमरावती, शिव व्याख्यानकार भाग्यश्रीताई मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी लव्ह जिहादच्या बळी ठरलेल्या एका महिलेचे आत्मकथन होणार आहे. महाराष्ट्रातील हिंदू तरुणी श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केल्यानंतर ते प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील रबिका पहाडन या हिंदू तरुणीचे 50 तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अशा एक-दोन घटना नसून असंख्य घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. ही वेळ आपल्या मुलींवर येऊ नये. तसेच दुसरीकडे देशात छळ-बळ-प्रलोभन दाखवून हिंदूंचे वाढते धर्मांतर नव्या राष्ट्रांतराला जन्म देऊ शकते. हे राष्ट्रघातकी ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सोमवार 2 जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आलेल्या ‘जन आक्रोश मोर्चा’ त लाखोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप.दामुअण्णा महाराज शिंगणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

वर्षभरात विदर्भातील 2807 महिला झाल्या बेपत्ता! गेल्या कुठे?

जानेवारी 2022 ते 30 डिसेंबर 2022 या वर्षभराच्या कालावधीमध्ये वाशिम जिल्ह्यातील 269 महिला व मुली बेपत्ता झाल्या असून अकोला जिल्ह्यातील 301 महिला, अमरावती शहरातील 323, अमरावती ग्रामीणमधून 517, बुलढाणा जिल्ह्यातील 553 तर यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधीक 844 महिला-मुली बेपत्ता झाल्या आहेत. सध्या त्या कुठे आहेत? काही लग्न करुन घरी परतल्या आहेत, याची आकडेवारी पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने ह्या मुली गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित होत असून यामध्ये जवळपास 93 टक्के बेपत्ता झालेल्या महिला ह्या हिंदु असल्याची आकडेवारी असल्याने हिेंदू महिला हिंदुस्थानात सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थीत होतो, हे विशेष!