मुंबई येथे लोककला महोत्सव उत्साहात
संजय निकाळजे..(10 Jan.2023)
मुंबई(Buldana News Update ) राज्यभरातील कलावंतांना मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तो हतबल होतो. त्यांच्या बऱ्याच मागण्या शासन दरबारी पडून आहेत. त्यामुळे त्यांना न्याय व त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. यासाठी निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore)यांनी केले. तर लोककलावंतांच्या (Lokkalavant) न्यायासाठी शासनाने महाकवी वामनदादा कर्डक (Mahakavi Wamandada Kardak)यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याची मागणी यावेळी कवी गायक विष्णु शिंदे (Singer Vishnu Shinde)यांनी केली.
लोककला सांस्कृतिक मंचच्या वतीने मनोरंजनातून प्रबोधनाची सुरेल बरसात व लोककला महोत्सवचे आयोजन शनिवार ७ जानेवारी रोजी रवींद्र नाट्य मंदिर(Ravindra Natya Mandal) प्रभादेवी दादर(पं) मुंबई (Mumbai) येथे करण्यात आले होते. याप्रसंगी ते उदघाटनप्रसंगी बोलत होते. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी लोककला सांस्कृतिक कला मंचाचे अध्यक्ष कवी गायक संगीतकार विष्णु शिंदे हे होते तर काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे( Manikrao Thakare), स्वागताध्यक्ष जी.के.डोंगरगावकर, गायिका चंद्रकला गायकवाड, डी .आर. इंगळे, गायक विश्वजीत शिंदे व मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना विष्णु शिंदे यांनी अनेक वर्षापासून सर्व समाज घटकातील कलावंतांचे कार्य संस्था करीत असून समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती नष्ट करण्यासाठी मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या लोक कलावंतांना संस्थेकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. योग्य कलागुण अवगत असून सुद्धा प्रसिद्धीपासून वंचित असलेल्या कलावंतांना संस्थेतर्फे विचार मंच उपलब्ध करून दिल्या जातो. कोरोना महामारीमुळे दोन वर्षापासून हे कार्य थांबले होते. मात्र संस्थेने पुन्हा नव्या उमेदीने कार्यारंभ करण्याचे ठरवून या महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे सांगून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, घरकुल योजनेमध्ये कलावंतांना दहा टक्के सवलत देण्यात यावी, त्याचप्रमाणे कलावंतांना कार्यक्रमासाठी बऱ्याच दूरवर जावे लागते व कलावंताची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे त्यांना एसटीचा मोफत पास देण्यात यावा. सिनेमातील नट्यांना व कलावंतांना जसे पुरस्कार देण्यात येतात त्याचप्रमाणे कलावंतांना सुद्धा पद्मभूषण व समाजभूषण पुरस्कार देण्यात यावा, त्यांच्या मानधनात देखील वाढ करण्यात यावी, अंध अपंग कलावंतांना देखील सवलत देऊन न्याय द्यावा, अशा मागण्या देखील सरकारने मंजूर कराव्या असे सांगितले. यावेळी अनेक कलावंतांना वेगवेगळे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर 75 वी ओलांडणाऱ्या कलावंतांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी शाहीर राजा कांबळे प्रस्तुत सदाबहार गर्जना शाहिरांची व लावणी नृत्य सादर करण्यात आले. शेवटी गायिका कडूबाई खरात प्रस्तुत गीतांचा सुमधुर सुरेली बरसात कार्यक्रम झाला. या लोककला महोत्सवाचे संचालन गायक हर्षद कांबळे व विनोद विद्याधर यांनी केले तर गायक विश्वजीत शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या महोत्सवाला बुलढाणा जिल्ह्यातून शाहीर शिवाजी लहाने, गायक देवानंद वानखेडे, गायक विजय मलवार,गायक तथा पत्रकार संजय निकाळजे यांच्यासह राज्यभरातून शाहीर, कवी, गायक, गायिका व कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलावंतांना शासकीय योजनांच्या लाभासाठी प्रयत्न करणार-मा.मंत्री हंडोरे
विष्णू शिंदे (Singer Vishnu Shinde)यांचे राज्यात कार्य मोठे असून कलावंतांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करत असतात. भविष्यात काँग्रेस सत्तेत आल्यास त्यांचा निश्चितच विचार करून त्यांना आमदारकी बहाल करू, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या घराचा प्रश्न देखील काँग्रेसच्या माध्यमातून नानाभाऊ पटोले व मी मार्गी लावला व त्यांना 32 लाखाचे घर दिले असे, असे माजी न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.