जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला; पोलिसांनी वर्षभरात 4564 आरोपींना केले गजाआड! आरोपींमध्ये 4039 पुरुष तर 525 महिलांचा समावेश!

266

88 आरोपींनी केले आत्मसमर्पण !

पोस्टे.निहाय आकडेवारी सविस्तर बातमीमध्ये!!

buldananewsupdate.com
बुलढाणा(11JAN..2023) जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारींच्या घटनेमध्ये मोठी वाढ होत आहे. महिलांवर वाढते अत्याचार हे एक चिंतनीय बाब आहे. जिल्ह्यातील महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून पुढे त्यांचे काय झाले याची कोणतीही आकडेवारी राज्यातील पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध नाही. महिलांच्या सुरक्षेच्या कायद्यांचे अस्तीत्व कागदावरच आहे. अवैधधंदे, गांज्या तस्करी, लैंगिक अत्याचार, अपहरण, खून, घरफोडी, रोड रॉबरी, दरोडा, समाजविघातक कार्य, हुंडाबळी, विवाहिता व मुलीस आत्महत्येस परावृत्त करणे, जुन्या वादातून जिवघेणा हल्ला यासह शेकडो गुन्हयांनी त्यामध्ये भर टाकली आहे. बुलढाणा जिल्ह्यात सन 2022 मध्ये अश्याच गंभीर गुन्ह्यातील 4564 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, त्यामध्ये 4039 पुरुष तर 525 महिलांना अटक करण्यात आली आहे, तर 88 आरोपींनी आत्मसमर्पण केले असून त्यामध्ये 63 पुरुष तर 25 महिला आरोपींचा समावेश आहे.

अनेक गुन्ह्याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण सुध्दा वाढत असल्याच्या नागरिकांमध्ये चर्चा होत असून तो सर्वसामान्य नागरिक एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकला तर त्याला पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात वेठीस धरुन पैश्यासाठी त्याची हर्रासमेंट केली जाते. एखाद्या व्यापाऱ्याच्या दुकानात चोरी झाली तर फिर्याद घेण्यास पोलिस प्रशासन मोठा त्रास देवून फिर्यादींना पोलिस स्टेशनच्या आवारात ईकडून-तिकडे असे तासनंतास उभे ठेवून त्रस्त केले जाते, त्यामुळे व्यापारी किंवा सर्वसामान्य नागरिक फिर्याद देण्यास धजावत नाही. घरात चोरी झाल्यास किती सोने गेले? पावत्या आहेत का? तुम्ही एवढे कसे कमावले, टॅक्स भरला होता काय, असा प्रश्नांचा भाडीमार केल्या जातो. गुन्हा घडला मग तो कोणताही असा त्यामध्ये संबंधित बिट जमदार, पीएसआय, एपीआय हा टपून असतो, एखाद्या 306 , 363 किंवा गंभीर गुन्ह्यामधील आरोपींना मोकळीक देवून त्यांच्याकडून पैसा वसूल केला जात असल्याने आरोपी राजरोसपणे मोकाट फिरतात, किंवा प्रकरणाचा समेट घडवून आणण्यासाठी पोलिस मुख्य भूमिका पार पाडतात. अनेक मोटार सायकल चोरीच्या फिर्यादी पोलिस वरच्यावरच सलटावून लावत असल्यामुळे भविष्यात त्या दुचाकीने अपघात झाला किंवा तिचा समाजविघातक कार्यासाठी उपयोग केला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सुध्दा उपस्थित होतो. अटक व आत्मसमर्पण केलेल्या आरोपींपैकी अनेकांना जामिन सुध्दा मिळालेला असेल..!

पोस्टे.निहाय अटक केलेल्या आरोपींची संख्या..
बुलढाणा जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 पर्यत वर्षाभरात पोलिस प्रशासनाने धडक कारवाई करीत अनेक गंभीर गुन्ह्यातील 4564 महिला व पुरुष आरोपींना पोलिसांनी गजाआड केले तर फरार आरोपीपैकी 63 पुरुषांनी व 25 महिलांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. प्राप्त माहितीनुसार अमडापूर पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील 205 पुरुष व 39 महिलांना अटक केली आहे. अंढेरा पोस्टे.च्या पोलिसांनी 118 पुरुष तर 24 महिला अटक केली, बिबी पोलिसांनी 36 पुरुष तर 2 महिलांना अटक केली, बोराखेडी पोलिसांनी 173 पुरुष तर 18 महिलांना अटक केली. बुलढाणा शहर पोलिसांनी 215 पुरुष तर 8 महिलांना अटक केली, बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी 85 पुरुष तर 8 महिलांना अटक केली, चिखली पोलिसांनी 311 पुरुष तर 45 महिलांना अटक केली, देऊळगाव राजा पोलिसांनी 123 पुरुष तर 10 महिला आरोपी, धाड पोलिसांनी 139 पुरुष तर 27 महिला आरोपी, धा.बढे पोलिसांनी 145 पुरुष तर 40 महिला, डोणगाव पोलिसांनी 36 पुरुष तर 6 महिला, हिवरखेड पोलिसांनी 68 पुरुष तर 2 महिला, जलंब पोलिसांनी 141 पुरुष तर 7 महिला, जळगाव जामोद 111 पुरुष तर 5 महिला, जानेफळ 62 पुरुष तर 14 महिला, खामगाव शहर पोस्टे.199 पुरुष तर 8 महिला, खामगाव ग्रामीण 215 पुरुष तर 25 महिला, किनगाव राजा पुरुष 49 तर महिला 15, लोणार पोस्टे.43 पुरुष तर 12 महिला, मलकापूर शहर पोस्टे.175 पुरुष तर 17 महिला, मलकापूर ग्रामीण 30 पुरुष तर 9 महिला, मेहकर पुरुष 93 तर महिला 4, एमआयडीसी मलकापूर पोस्टे.45 पुरुष, नांदुरा पोस्टे.पुरुष 242 तर 20 महिला, पिं.राजा 103 पुरुष तर 12, रायपूर 37 पुरुष तर 10 महिला, साखरखेर्डा पुरुष 85 तर महिला 5, शेगाव शहर पुरुष 168 तर 11 महिला, शेगाव ग्रामीण 97 पुरुष तर 15 महिला, शिवाजी नगर 165 पुरुष तर 30 महिला, सिंदखेड राजा पुरुष 85 तर महिला 15, सोनाळा पोस्टे.42 पुरुष तर 2 महिला, तामगाव पोस्टे.198 पुरुष तर 40 महिलांना अटक करण्यात आली.

88 आरोपींनी केले आत्मसमर्पण..
अंढेरा पोस्टे.अंतर्गत एका आरोपीने आत्मसमर्पण केले तर बुलढाणा शहर पोस्टे.मध्ये 32 पुरुष तर 9 महिलांनी, बुलढाणा ग्रामीण 1 पुरुष, चिखली 2 पुरुष, धाड पोस्टे.6 पुरुष तर 4 महिला, हिवरखेड 3 पुरुष, 4 महिला, खामगाव शहर पोस्टे.12 पुरुष तर 8 महिला, लोणार 1 पुरुष, मेहकर 2 पुरुष अश्याप्रकारे 63 पुरुष व 25 महिलांनी आत्मसमर्पण केले आहे.

चिखली पोस्टे.नंबर एकवर..
बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधीक चिखली पोस्टे.अंतर्गत 311 पुरुष व 45 महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ नांदुरा पोस्टे.असून 242 पुरुष तर 20 महिलांना अटक करण्यात आली आहे. तर बुलढाणा शहर व खामगाव ग्रामीण तीन नंबरवर असून त्यामध्ये 240 व 242 आरोपींना अटक करण्यात आली आहे.