मोताळ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत;वृध्द गंभीर जखमी!

647

buldananewsupdate.com
मोताळा(11JAN.2023) मलकापूरकडे जाणाऱ्या मोताळा येथील दिनकर उर्फ बिच्छू सुरडकर याला रविवार 8 जानेवारी रोजी अज्ञात वाहनाने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारार्थ अकोला दाखल करण्यात आले होते. तोच आज बुधवार 11 जानेवारी रेाजी एका अज्ञात वाहनाने नांदुरा रोडवरील विश्राम गृह (एमएसईबी पॉवर हाऊस)जवळा एका 75 वर्षीय वृध्दास जोरदार धडक दिली, या धडकेत सदर वृध्दाच्या पायाचे तुकडे पडले आहे. वृध्दाचे नाव तुळशीराम चव्हाण असे आहे.

थंडीचा जोर जास्त असल्याने रात्री आठनंतर शक्यतो कुणी बाहेर येत नाही, त्यातच मोताळा ते नांदुरा रोडचे नव्यानेच डांबरीकरण झाल्याने चारचाकी, दुचाकी वाहने मोठ्या वेगाने धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आज 11 जानेवारी रोजी रात्री 8.45 वाजेच्या दरम्यान मोताळा येथील तुळशिराम नामदेव चव्हाण या 75 वर्षीय इसमाला अज्ञात वाहनाने नांदुरा रोडवरील विश्राम गृहाजवळ जबर धडक दिली. या धडकेत तुळशीराम चव्हाण या वृध्दाच्या पायाचे तुकडे पडले, यावेळी अज्ञात वाहनाने जागेवरुन पळ काढला. सदर घटना रोडने जाणाऱ्या दिसल्याने त्यांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. यावेळी रुग्णवाहिका चालक अंकुश वाघ व डॉ.शुभम डोंगरे कर्तव्यदक्षता दाखवित क्षणांचा विलंबही न लावता घटनास्थळी धाव घेवून सदर जखमी वृध्दावर मोताळा ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे प्राथमीक उपचार करुन पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे.

अंकुश वाघ यांची कर्तव्यदक्षता..
108 रुग्णवाहिका चालक अंकुश वाघ यांना कोणत्याही घटनेची माहिती मिळताच ते कर्तव्यदक्षता दाखवित घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त जखमींना वेळेवर उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण सुध्दा वाचले आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे मोताळा वासीयांकडून कौतूक होत आहे.