रोहिणखेड येथे भिषण अपघात; 1 गंभीर

1435

ट्रक चालकास संजय मापारी व ग्रामस्थांनी 2 कि.मी. अंतरावर पकडले

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (14 ‍Feb. 2023) रोहिणखेड धा.बढे रोडवर रोहिणखेड गावानजीक 12 गाव पाणी पुरवठा योजना टाकीजवळ आज 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी भिषण होती, की या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी होवून त्याच्या पायाच्या हड्डया तुटून अक्षरश: रोडवर पडल्या होत्या. संजय मापारी व ग्रामस्थांनी घटनास्थळावरुन फरार होणाऱ्या ट्रक चालकाचा पाठलाग करुन त्याला 2 कि.मी.अंतरावर पकडून त्याला चोप दिला.

रोहिणखेड गावाजवळील वळणावर अनेक अपघात झाले आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण सुध्दा गमवावे लागले आहे. आज 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास धा.बढे येथील मोबीन शहा अमिर शहा( वय 45) हे आपल्या दुचाकीने बुलढाणाकडे जात असतांना रोहिणखेड गावापासून 1 कि.मी.अंतरावर असलेल्या 12 गाव पाणी पुरवठा पाण्याच्या टाकीजवळ धा.बढे जाणाऱ्या ट्रक क्र. एम.एच.19 सीवाय-9355 या ट्रकच्या चालकाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मोबीन शहा अमिर शहा यांच्या पायाचे अक्षरश: तुकडे पडले आहेत. त्यांच्यावर बुलढाणा येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. यावेळी ट्रक सोडून फरार होणाऱ्या चालकाला रोहिणखेड येथील संजय मापारी व इतर ग्रामस्थांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच धा.बढे पोस्टे.काही पोलिस घटनास्थळावर पोहचले होते. वृत्तलिहेपर्यंत धा.बढे पोस्टे.गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

स्वप्नील दळवी यांची सामाजिक बांधीलकी..
रोहिणखेड येथे सामाजिक कार्यात अग्रेसर तसेच अनेकांना वेळेप्रसंगी रक्ताची व्यवस्था व रक्तदान कॅम्पचे आयोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील दळवी यांना घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता आपल्या चारचाकी वाहनामध्ये जखमी मोबीन शहा अमिर शहा यांना बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल केले.