बोराखेडी येथे इसमाची गळफास घेवून आत्महत्या!

573

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (14 ‍Feb. 2023) मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथे बचतगटाचे व इतर कर्ज कसे फेडावे त्यातच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचेनत 55 वर्षीय अशोक बरडे यांनी आज 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

बोराखेडी येथे अशोक बरडे कुटुंबीयांसोबत राहतात. मजुरीच्या भरवश्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. अशोक बरडे व त्यांची पत्नी संसाराचा गाडा हाकलत होते. कुटूंबात एकूण पाच मुली व एक मुलगा घरातील कर्ता पुरुष असल्याने संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती. अत्यल्प मजुरीत भागत नसल्याने त्यांनी काही हातउसणे पैसे तसेच बचतगटाचे कर्ज सुध्दा घेतले होते. बचत गटाचे कर्जाचे हप्ते कसे भरावे? कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतच त्यांनी 14 फेब्रुवारी सकाळी 10.15 सुमारास राहत्या घरात गळफास घेतला, सदर घटना कुटुंबीय व गावकऱ्यांच्या लक्षात येतात त्यांना मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. बरडे कुटुंबीयांची परिस्थीती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी होत आहे.